'एआय'चा सुपर वॉच; रुग्णालयांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक कॅमेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2025 12:12 IST2025-03-02T12:11:23+5:302025-03-02T12:12:08+5:30

विभागीय कार्यालये, नाट्यगृह, जलतरण तलावांमध्येही यंत्रणा

ai super watch state of the art cameras for hospital security | 'एआय'चा सुपर वॉच; रुग्णालयांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक कॅमेरे

'एआय'चा सुपर वॉच; रुग्णालयांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक कॅमेरे

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांच्या सुरक्षा व्यवस्थेवर आता कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात 'एआय' आधारित कॅमेऱ्यांचा वॉच असणार आहे. के. ई. एम, सायन, नायर धर्मार्थ रुग्णालय, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व कुपर रुग्णालयात हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. प्रसूतिगृह, उपनगरी रुग्णालये तसेच विभाग कार्यालये अणि पालिकेची नाट्यगृह व जलतरण तलाव येथेही अशाच प्रकारचे कॅमेरे पुढील टप्प्यांत बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे संबंधित वास्तूंच्या परिसरात येणाऱ्या व्यक्तींच्या चेहऱ्याची ओळख, तसेच ये-जा करणाऱ्या वाहनांची माहिती या माध्यमातून मिळवणे शक्य होणार आहे.

मुंबई महापालिकेच्या सुरक्षा दलाचा ५९ वा वर्धापन दिन उपायुक्त (विशेष) चंदा जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत शुनिवारी भांडुप संकुलातील सुरक्षा दल प्रशिक्षण केंद्रात पार पडला. यावेळी ही माहिती देण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख सुरक्षा अधिकारी अजित तावडे उपस्थित होते.

पालिकेच्या सुरक्षा दलाच्या आधुनिकीकरणाच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व अत्याधुनिक सुरक्षा उपकरणे प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सुरक्षा कर्मचाऱ्यांकरिता ई-मस्टर प्रणालीही लवकरच कार्यान्वित होणार आहे, असे जाधव यांनी संगितले.

सुरक्षा अधिकारी आणि एकूण ३८४ सुरक्षारक्षकांना आतापर्यंत एकूण १० तुकड्यांमध्ये प्रशिक्षण देण्यात आले आहे.

सुरक्षा अधिकाऱ्यांना टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण

आपत्कालीन घटना प्रभावीपणे हाताळण्याच्या दृष्टीने सर्व सुरक्षा अधिकारी व सुरक्षा रक्षक यांना आपत्कालीन व्यवस्थापन विषयक १२ दिवसांचे प्रशिक्षण टप्प्याटप्प्याने दिले जात आहे. प्रशिक्षित सुरक्षा रक्षकांना पावसाळ्यात मुंबईतील सहा महत्त्वाच्या समुद्र चौपाट्यांवर बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येते, अशी तावडे यांनी दिली.

नेतृत्व गुण आणि मार्गदर्शक तत्त्वे

शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. तसेच, विविध स्पर्धामध्ये यश मिळवलेल्या, विशेष कामगिरी बजावलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सत्कार करण्यात या कार्यक्रमात आला.

सुरक्षा दलातील कर्मचारी अणि अधिकारी यांची कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टीने, तसेच नेतृत्व कौशल्य वाढीस लागावे याकरिता 'नेतृत्व गुण आणि त्याची मार्गदर्शक तत्त्वे' या विषयावर प्रसिद्ध लेखक व प्रशिक्षक डॉ. राधाकृष्णन पिल्लई यांच्या मुख्य उपस्थितीत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

Web Title: ai super watch state of the art cameras for hospital security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.