Join us
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धीवर सुरक्षिततेसाठी एआय-आधारित प्रणाली; राज्यमंत्री मेघना साकोरे - बोर्डीकर यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 04:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर सुरक्षिततेसाठी देशातील पहिली एआय-आधारित इंटेलिजेंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम बसविण्याचे काम ...

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर सुरक्षिततेसाठी देशातील पहिली एआय-आधारित इंटेलिजेंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम बसविण्याचे काम प्रगतिपथावर आहे. यामुळे वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम होऊन भविष्यात अपघातांचे प्रमाण घटण्यास मदत होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली.

सुधाकर अडबाले यांच्यासह शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी या सदस्यांनी विधानपरिषदेत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी समृद्धी महामार्गावर क्रॅश बॅरियर्स, रबर स्ट्रिप्स, साईनबोर्ड अशा सर्व आवश्यक उपाययोजना केल्याचे सांगितले.

जोडरस्त्यांचे काम गतीने पूर्ण करणारएमएमआरडीएमार्फत ठाणे-मुंबईदरम्यान बांधण्यात येणार रिंग रोड व उन्नत मार्ग समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे.छेडानगर ते आनंदनगर तसेच  ठाणे ते मुंबई दरम्यानचे रस्ते विकसित करण्यासाठी बीओटी तत्त्वावर किंवा इतर माध्यमांतून निधी उभारण्याचे पर्याय तपासले जात आहेत.नागरिकांचा प्रवास गतिमान करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विविध जोडरस्त्यांचे नियोजन करण्यात आले असून ही कामे गतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही राज्यमंत्री बोर्डीकर म्हणाल्या.

English
हिंदी सारांश
Web Title : AI-Based System for Samruddhi Highway Safety: Minister Sakore-Bordikar

Web Summary : Samruddhi Mahamarg is implementing India's first AI-based Intelligent Transportation System for enhanced safety. This will improve traffic management and reduce accidents. Minister Sakore-Bordikar also mentioned plans to expedite connecting roads for faster commutes, under CM Fadnavis' guidance. Necessary safety measures are already in place.
टॅग्स :समृद्धी महामार्गविधानसभा