Join us  

एसटी कर्मचाऱ्यांचे पगार न दिल्यास आंदोलन - प्रवीण दरेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 7:16 AM

कोरोनाच्या काळात जीवाची बाजी लावणा-या कर्मचा-यांना तीन महिन्यांपासून पगार नाही. त्यांचे घर चालणार कसे, असे सवाल उपस्थित करीत आठ दिवसांत पगार न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.

मुंबई : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन आठ दिवसांत न दिल्यास राज्यातील सर्व एसटी आगारांमध्ये तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी गुरुवारी दिला. कर्मचाºयांचे थकीत पगार आणि अन्य प्रलंबित मागण्यांसाठी दरेकर यांच्या नेतृत्वाखालील भाजप शिष्टमंडळाने आज एसटीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांची भेट घेऊन चर्चा केली. कोरोनाच्या काळात जीवाची बाजी लावणा-या कर्मचा-यांना तीन महिन्यांपासून पगार नाही. त्यांचे घर चालणार कसे, असे सवाल उपस्थित करीत आठ दिवसांत पगार न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला. परिवहनमंत्री अनिल परब यांच्या कारभारावरही त्यांनी ताशेरे ओढले. परिवहनमंत्र्यांनी तीनशे रुपयांचा भत्ता जाहीर केला होता; पण अजूनपर्यंत अनेक कर्मचाºयांना भत्ता मिळालेला नसल्याची आठवण करून दिली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एसटीच्या ४३ कर्मचाºयांच्या कुटुंबीयांना ५० लाखांचे विमा कवच तत्काळ देण्याची मागणीही दरेकर यांनी केली.

टॅग्स :प्रवीण दरेकर