Join us  

सकल मराठा क्रांती महामोर्चाचा पुन्हा आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2018 5:59 AM

मराठा समाजासाठी वसतिगृह, सारथी संस्थेचा कारभार, आरक्षणात मृत पावलेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन अशा प्रलंबित मागण्यांच्या अंमलबजावणीस सरकारकडून विलंब होत आहे. त्यामुळे सकल मराठा क्रांती महामोर्चाने पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे.

मुंबई : मराठा समाजासाठी वसतिगृह, सारथी संस्थेचा कारभार, आरक्षणात मृत पावलेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन अशा प्रलंबित मागण्यांच्या अंमलबजावणीस सरकारकडून विलंब होत आहे. त्यामुळे सकल मराठा क्रांती महामोर्चाने पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे.मागण्यांच्या पूर्ततेसाठी उपोषणास बसलेल्या समन्वयकांना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सरकारचे प्रतिनिधी म्हणून आश्वासन दिले होते. मात्र ते पूर्ण होत नसल्याने पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा समन्वयक विनोद पोखरकर यांनी दिला आहे. पोखरकर म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण जाहीर केल्यापासून सरकारला इतर मागण्यांचा विसर पडला आहे. आरक्षणाच्या लढाईत मृत पावलेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांचे अद्याप पुनर्वसन झालेले नाही. मृतांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपये मदत आणि एकाला शासकीय नोकरी असे आश्वासन सरकारने दिले होते. त्याची तूर्तास अंमलबजावणी करावी. मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन देणारे सरकार आता समाजाची फसवणूक करत असल्याची भावना जनमानसात आहे. त्यामुळे पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा पोखरकर यांनी दिला आहे.

टॅग्स :मराठा