अगिAशमन केंद्र हलवणार

By Admin | Updated: November 29, 2014 00:57 IST2014-11-29T00:57:12+5:302014-11-29T00:57:12+5:30

गेल्या पाच वर्षापासून वाशीतील धोकादायक इमारतीत सुरू असलेले अगिAशमन केंद्र बंद करण्यात येणार आहे.

Aging A will move the quenching center | अगिAशमन केंद्र हलवणार

अगिAशमन केंद्र हलवणार

नवी मुंबई : गेल्या पाच वर्षापासून वाशीतील धोकादायक इमारतीत सुरू असलेले अगिAशमन केंद्र बंद करण्यात येणार आहे. येत्या 15 दिवसांत हे कार्यालय कंटेनर केबिनमध्ये हलविण्यात येणार आहे. 
नवी मुंबई महानगरपालिके ही इमारत पाच वर्षापूर्वी धोकादायक घोषित केली होती. परंतु अजूनही याच इमारतीमध्ये कामकाज सुरू आहे. धोकादायक बनलेल्या या इमारतीमध्ये अजून काही अधिकारी वास्तव्य करत आहेत. नियंत्रण कक्षही सुरू आहे. दुर्घटनांमध्ये शहरवासीयांना वाचविण्याची जबाबदारी अगिAशमन कर्मचा:यांवर असते. परंतु पाच वर्षे त्यांच्याच डोक्यावर अपघाताची टांगती तलवार लटकलेली आहे. महापालिकेने इमारतीच्या पुनर्बाधणीसाठी अनेक वेळा निविदा काढल्या आहेत. परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. 
अग्निशमन विभागाच्या धोकादायक इमारतीचे पडसाद स्थायी समितीमध्ये उमटले. नगरसेवक राजू शिंदे यांनी प्रशासनास धारेवर धरल्यानंतर व सिंधू नाईकसह इतर नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर अगिAशमन विभागाचे उपआयुक्त जगन्नाथ सिन्नरकर यांनी पुढील 15 दिवसांमध्ये इमारतीचा वापर बंद करण्यात येईल असे स्पष्ट केले. कंटेनर केबिनमध्ये नियंत्रण कक्ष  तर  इतर गोष्टी नेरूळ व ऐरोली कार्यालयामध्ये हलविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी) 

 

Web Title: Aging A will move the quenching center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.