वृद्ध दाम्पत्याच्या प्रतिकाराने दरोडा फसला

By Admin | Updated: January 10, 2015 22:33 IST2015-01-10T22:33:51+5:302015-01-10T22:33:51+5:30

सारसोळे येथे महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी जबरी दरोड्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी रात्री वाशीत आणखी एक दरोड्याचा प्रयत्न झाला.

Aggrieved by the aging couple, the failure of the crackdown | वृद्ध दाम्पत्याच्या प्रतिकाराने दरोडा फसला

वृद्ध दाम्पत्याच्या प्रतिकाराने दरोडा फसला

नवी मुंबई : सारसोळे येथे महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी जबरी दरोड्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी रात्री वाशीत आणखी एक दरोड्याचा प्रयत्न झाला. झोपा काढणाऱ्या सुरक्षा रक्षकामुळे दरोडेखोरांनी सोसायटीत बिनधास्त प्रवेश केला. यावेळी प्रतिकार झाल्याने दरोडेखोरांनी वृद्ध दांपत्यावर हल्ला केला. यात दोघेही गंभीर जखमी झाले आणि सुमारे दोन तास दोघेही वेशुद्ध अवस्थेत रक्तबंबाळ होऊन पडले होते. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.
वाशी सेक्टर १६ येथील चित्तोडगड रहिवाशी सोसायटीमधे मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास दरोड्याची घटना घडली. पहिल्या मजल्यावर राहणारे रमणलाल शेठ (७२) व त्यांच्या पत्नी लिला शेठ (६०) हे वृध्द दांपत्य घरामधे एकटेच होते. यावेळी दरवाजा आतून बंद असतानाही कडी तोडून चौघा दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. मात्र त्यांची चाहूल लागताच रमणलाल व लिला यांना जाग आली. त्यांनी आरोडा ओरडा करत दरोडेखोरांना प्रतिकार केला. यावेळी दरोडेखोरांनी लोखंडी रॉडने दोघा वृध्दांवर हल्ला केला. त्यामधे रमणलाल व लिला यांच्या डोक्यावर व पायावर गंभीर दुखापत होऊन दोघेही रक्तबंबाळ होऊन जागीच पडले. त्यानंतर घरातील ऐवज लुटून दरोडेखोरांनी तेथून पळ काढला. दरोडेखोरांच्या हल्यात जखमी झालेले वृध्द दांपत्य सुमारे दोन तास रक्ताच्या थारोळ्यात बेशुध्द अवस्थेत पडून होते. पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास लिला यांना जाग येताच त्यांनी पतीच्या कार्यालयात काम करणाऱ्या कामगाराला मोबाइलवर फोन करुन घरी बोलावून घेतले. यावेळी शेठ यांच्या घराचा दरवाजा उघडाच होता तर दोघेही रक्तबंबाळ अवस्थेत होते. दरोड्याच्या घटनेची माहिती मिळता इमारतीमधे राहणाऱ्या नागरीकांनीच त्यांना वाशीतील फोर्टीज रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असुन रमनलाल यांची प्रकृती चिंताजनक आहे.
दरवाजा तोडण्यापूर्वी शेठ यांच्या घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेराची दिशाही त्यांनी बदलली होती. यावरून सराईत गुन्हेगारांची ही टोळी असल्याची शक्यता आहे. दरोडेखोरांच्या या सर्व हालचाली सोसायटीमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधे कैद झाल्या आहेत. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अडीच तास संघर्ष
च्रमणलाल यांची काही दिवसांपूर्वी अँजिओप्लास्टी झाली. रक्त गोठू नये यासाठी त्यांची औषधे सुरु आहेत. दरोडेखोरांनी केलेल्या हल्यात रमणलाल यांच्या डोक्याला जबर मार लागला.
च्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. जखमेच्या ठिकाणी रक्त न गोठल्याने त्यांचा सतत रक्तस्त्राव सुरुच होता. अशा अवस्थेतच ते सुमारे अडीच तास पडले होते.
१०८ क्रमांक निरुपयोगी
च्जखमी अवस्थेतील वृद्ध दांपत्याला
रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकेची गरज होती. इमारतीतील रहिवाशी विजय वाळुंज हे १०८ क्रमांकावर रुग्णवाहिकेसाठी सतत प्रयत्न करत होते.
च्परंतु कॉल होल्ड ठेवल्यामुळे त्यांना रुग्णवाहिका मिळाली नाही. अखेर खासगी रुग्णालयाची मदत घ्यावी लागली.
एकच सुरक्षारक्षक
च्इमारतीला एकच सुरक्षा रक्षक नेमलेला आहे. दिवस रात्र त्याच्यावरच सोसायटीच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. शुक्रवारी रात्री तो बेजबाबदारपने सोसायटीचे गेट उघडेच ठेवून झोपलेला होता. त्यामूळे दरोडेखोरांना थेट सोसायटीत प्रवेश मिळाला.

 

Web Title: Aggrieved by the aging couple, the failure of the crackdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.