एजंट करतात १ मिनिटात रेशनकार्डाची कामे
By Admin | Updated: December 16, 2014 22:42 IST2014-12-16T22:42:35+5:302014-12-16T22:42:35+5:30
शिधा पत्रिका काढायचीय, नाव बदलायचय, पत्ता बदलायचाय, असे शासकीय पातळीवरील शिधापित्रकेसंदर्भातील कोणतेही काम सहजासहजी होणे अवघडच आहे.

एजंट करतात १ मिनिटात रेशनकार्डाची कामे
उमेश जाधव, टिटवाळा
टिटवाळा : शिधा पत्रिका काढायचीय, नाव बदलायचय, पत्ता बदलायचाय, असे शासकीय पातळीवरील शिधापित्रकेसंदर्भातील कोणतेही काम सहजासहजी होणे अवघडच आहे. मात्र, महिनो न महिने न होणारे हे काम मिनिटभरात करून देण्याची हमी एजंटांकडून दिली जात असल्याचे चित्र आहे. कल्याण परिमंडळच्या शिधावाटप कार्यालयात अशा तथाकथीत समाजसेवकांचा बुरखा परिधान केलेल्या पुरूष आणि महिलाचा सुळसुळाट येथे दिसून येतो. हे कार्यालय एजंटांनी घेरले आहे. यामुळे त्यांची आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांची मिलिभगत असल्याने शिधापित्रकेचे काम दक्षिणा दिल्या घेतल्याशिवाय होत नसल्याचे दिसून आले आहे.
मुरबाड रोड परिसरातील कल्याणचे अन्नधान्य पुरवठा परिमंडळाचे (शिधा पत्रिका) कार्यालय आहे. तसे पाहिले तर कार्यालयाची जागा अपुरी आहे. मात्र या ठिकाणी नवीन शिधा पत्रिका काढणे, पत्त्यात बदल करणे, कुटुंबप्रमुखामधील बदल, दुकानासंबंधिचा बदल, नाव वगळणे, नाव दुरुस्त करणे आदी कामे केली जातात. स्वस्त धान्य दुकानांना दिला जाणारा कोटाही मंजूर केला जातो. कार्यालयाच्या आवारात शिधा पत्रिकांची वेगवेगळी काम करून देणारी मंडळी वावरत असतात. ‘काय करायचंय’, असे आस्थेवाईकपणे विचारतात. आणि मग संवाद सुरू होतो. अर्ज भरण्यापासून तर अर्ज सादर करेर्पयतची माहिती देतात. कार्यालयात अर्ज दिला तर किती वेळ आणी आमच्याकडून केले तर किती वेळ याचीही माहिती देतात. कार्यालयाच्या दारातच शिधापत्रिकेचे अर्ज वाटणारा कर्मचारी टेबल टाकून बसलेला आहे. कार्यालय प्रवेशाच्या ठिकाणीच तो बसल्याने आतमध्ये जाणारांचा रस्ता बंद झालेला दिसतो. मात्र, नियमित ‘चेहऱ्यानाच’ तो टेबल सरकवून आत सोडतो. कर्मचारी नसणारे बाहेरील काहीजण तर समोरच असणाऱ्या कार्यालय प्रमुखांच्या कक्षातच फायलींची शोधाशोध करताना दिसून येतात.