Join us

समता नगर सरोवाया  संकुलातील पाणीटंचाई विरोधात; १००० हुन अधिक नागरिकांनी केला रास्ता रोको

By मनोहर कुंभेजकर | Updated: June 30, 2024 19:08 IST

मुंबई-कांदिवली पूर्वेकडील,समता नगर,ठाकूर कॉलेज समोरील सरोवाया म्हाडाच्या पुनर्विकसित संकुलात दि, २५ मार्चपासून पाणीटंचाई आहे. सुमारे 2000 घरे असणाऱ्या ३२ ...

मुंबई-कांदिवली पूर्वेकडील,समता नगर,ठाकूर कॉलेज समोरील सरोवाया म्हाडाच्या पुनर्विकसित संकुलात दि, २५ मार्चपासून पाणीटंचाई आहे. सुमारे 2000 घरे असणाऱ्या ३२ मजली इमारतींना सकाळी आणि संध्याकाळी फक्त १५ ते २० मिनीटे पाणी येतं.विकासकाकडून उडवाउडवीचं उत्तर मिळतात. अखेर आज सकाळी १० वाजल्यापासून महिला व नागरिक रस्त्यावर उतरले.दुपार नंतर येथील नागरिकांनी रास्ता रोको करून येथील रस्ता आडवला.

येथील स्थानिक रहिवासी यांनी सांगितले की,सरोवाया म्हाडाच्या पुनर्विकसित संकुलात दि, 25 मार्चपासून पाणीटंचाई आहे.जेमतेम रोज १५ ते २० मिनीटे पाणी येते.पाणी येत नसल्याने येथील महिला हवालदिल झाल्या आहे.बिल्डर एस.डी. कॉर्पोरेशन उडवा उडवीची उत्तरे देतो ,तर वारंवार तक्रारी करुन सुद्धा महापालिका आणि जलखाते याकडे लक्षच देत नाही.त्यामुळे अखेर सहनशीलतेचा अंत झाल्याने दुपार पासून एक हजारहून अधिक महिला व नागरिकांनी रस्तावर उतरून त्यांनी रास्ता रोको केले आणि अजूनही सहा वाजले तरी आंदोलन सुरच आहे.

याबाबत शिंदे सेनेचे स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांनी सांगितले की,येथील पाणी टंचाई बाबत पालिका आयुक्त भूषण गगराणी आणि जलाभियंता यांच्या बरोबर लवकर बैठक घेवून तोडगा काढू. 

टॅग्स :पाणीकपात