पुन्हा ई-तिकिटाचे वारे

By Admin | Updated: July 12, 2014 23:36 IST2014-07-12T23:36:11+5:302014-07-12T23:36:11+5:30

बासनात गुंडाळून ठेवलेला ई-तिकिटांचा प्रस्ताव ठाणो परिवहन सेवेने तीन वर्षानंतर पुन्हा एकदा बाहेर काढला आहे.

Again e-ticket winds | पुन्हा ई-तिकिटाचे वारे

पुन्हा ई-तिकिटाचे वारे

अजित मांडके - ठाणो
बासनात गुंडाळून ठेवलेला ई-तिकिटांचा प्रस्ताव ठाणो परिवहन सेवेने तीन वर्षानंतर पुन्हा एकदा बाहेर काढला आहे. परिवहनच्या सेवेत नव्याने जेएनएनयूआरएमअंतर्गत 23क् बसेस दाखल होणार असल्याने धोरणात्मक बाब म्हणून परिवहनने हा प्रस्ताव तयार केला आहे. विशेष म्हणजे यासाठी सात कोटी 3क् लाखांचा खर्च केला जाणार असून बीओटी स्वरूपात याचे काम करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. परंतु, तसे झाल्यास सध्या असलेल्या दोन ठेकेदारांचा ठेका रद्द करण्याची वेळ परिवहनवर आली आहे.
परिवहन सेवेने 2क्11 मध्ये ई-तिकिटांची सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर, यासाठी तीन वेळा निविदासुद्धा काढल्या होत्या. परंतु, त्याला प्रतिसादच मिळाला नाही. असे असताना महापालिकेने याचा प्रायोगिक तत्त्वावर वापर केला. परंतु, त्यात त्रुटी आढळल्याने परिवहनने हा प्रस्ताव अखेर बासनात गुंडाळला होता. त्यानंतर, आता जेएनएनयूआरएमअंतर्गत नव्या बसेस दाखल होणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता प्रशासनाला ई-तिकिटांचा वापर करावा लागणार असून यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घ्यावा लागणार आहे. 
त्यानुसार, आता परिवहन प्रशासनाने ई-तिकिटांचा प्रस्ताव नव्याने तयार केला असून आता तो आगामी महासभेत मंजुरीसाठी सादर होणार आहे. हे काम आता बीओटी तत्त्वावर करण्यात येणार असून यासाठी सात कोटी 3क् लाखांचा खर्च केला जाणार आहे. भविष्यात परिवहनमध्ये 532 बसेसचा ताफा राहणार आहे. ही बाब लक्षात घेता ई-तिकीट कार्यप्रणाली लागू करताना नव्याने ताफ्यात दाखल होणा:या बसेसचाही अंतर्भाव करण्यात येणार आहे.  
भविष्यात दाखल होणा:या बसेसचा विचार करता एकूण 12क्क् ई-तिकीट मशिन्स आवश्यक असणार आहेत. तसेच ही प्रणाली लागू करण्यासाठी डेटा सेंटर, सॉफ्टवेअर, हार्डवेअर व देखभाल दुरुस्ती, कॉमन मोबालिटी कार्ड, तिकीट व रोखा विभागाचे दैनंदिन कामकाज, विद्यार्थी पास वितरण, तांत्रिक कर्मचारी, कर्मचा:यांना प्रशिक्षण तसेच वाढीव बसेसचा विचार करता परिवहनमध्ये चार लाख प्रवासीसुद्धा भविष्यात होऊ शकतात. त्यानुसार, एकूण प्रवासी 4 लाख अपेक्षित धरून प्रति तिकीट 1क् पैसे खर्च व त्यावरील सेवाकर 12.36 टक्के विचारात घेता 1 कोटी 46 लाख अधिक सेवा कर असा प्रति वर्षी खर्च अपेक्षित आहे. त्यानुसार, आता पुढील पाच वर्षासाठी निविदा मागवण्यात येत असल्याने या पाच वर्षाचा खर्च सात कोटी 3क् लाख अधिक सेवा खर्च असा अपेक्षित धरण्यात आला आहे. 
 
सुरुवात सिस्टीम मॅनेजरच्या देखरेखीखाली 
च्दरम्यान, ही प्रणाली कार्यान्वित करण्याचे परिवहनने निश्चित केले असले तरी त्यांच्याकडे संगणक सॉफ्टवेअर या क्षेत्रतील तज्ज्ञ अधिकारी नसल्याने ही यंत्रणा सुरुवातीला महापालिकेच्या सिस्टीम मॅनेजरच्या देखरेखीखाली सुरू करण्यात येणार आहे. सध्या परिवहन सेवेकडील तिकीट व रोखा विभागाचे कामकाज संगणकीकृत करण्यात आले असून हे काम खाजगी ठेकेदाराला देण्यात आले आहे. पाच वर्षाकरिता सध्या हे काम सुरू आहे. तसेच विद्यार्थी व प्रवासी पास संगणकीकृत वितरणाचे कामही खाजगी ठेकेदाराला देण्यात आले आहे. आता ई-तिकीट सेवा बीओटीवर सुरू होणार असल्याने सध्याच्या ठेकेदारांचा ठेका रद्द करावा लागणार असल्याचे परिवहनने स्पष्ट केले आहे. 

 

Web Title: Again e-ticket winds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.