पुन्हा एकदा दाऊद इब्राहिम
By Admin | Updated: April 23, 2016 13:54 IST2016-04-23T13:48:42+5:302016-04-23T13:54:32+5:30
मुंबई बाँबस्फोटातला मुख्य आरोपी व गुंड दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्येच असल्याचे दाखवणारा आणखी एक फोटो समोर आला आहे

पुन्हा एकदा दाऊद इब्राहिम
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - मुंबई बाँबस्फोटातला मुख्य आरोपी व गुंड दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्येच असल्याचे दाखवणारा आणखी एक फोटो समोर आला आहे. इंडिया टुडेनं हे वृत्त व फोटो दिला असून भारतीय पत्रकार विवेक अगरवाल यांनी हा फोटो आंतरराष्ट्रीय स्तरावरील सूत्रं वापरून काही वर्षांपूर्वी मिळवल्याचं सांगितलं आहे. त्यावेळी दाऊद मोइन पॅलेसमध्ये राहत होता, जो नंतर क्लिफ्टन या आलिशान परीसरात राहण्यास गेला.
दाऊद इब्राहिमचे मोजकेच फोटो उपलब्ध असून बाँबस्फोटाआधी तो जो पसार झाला तेव्हापासून कुणीही त्याला बघितलेलं नाही. परंतु तो कराचीत असल्याचे भारतीय सुरक्षा यंत्रणांनी वारंवार सिद्ध करूनही पाकिस्तानने मात्र नेहमीच कानावर हात ठेवले आहेत.
अगरवाल यांचं मुंभाई नावाचं पुस्तक येत असून त्याच्या मुखपृष्ठावर हा फोटो वापरण्यात आला आहे.