दहिसर नदी रुंदीकरणाचा मार्ग दहा वर्षांनंतर मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 12:18 AM2020-02-12T00:18:06+5:302020-02-12T00:18:10+5:30

झोपड्यांवर कारवाई : बोरीवलीत पावसाच्या पाण्याचा जलद निचरा

After ten years, the path to widening the Dahisar River is open | दहिसर नदी रुंदीकरणाचा मार्ग दहा वर्षांनंतर मोकळा

दहिसर नदी रुंदीकरणाचा मार्ग दहा वर्षांनंतर मोकळा

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पावसाळ्यात अथवा अतिवृष्टीच्या काळात दहिसर नदी धोक्याची पातळी ओलांडत असल्याने याचा मोठा फटका बोरीवली पूर्व येथील रहिवाशांना बसत आहे. यावर उपाय म्हणून नदीकिनारी संरक्षक भिंत बांधण्यात येत आहे. मात्र या परिसरातील झोपड्यांमुळे हे काम तब्बल दहा वर्षे रखडले होते. अखेर पोलीस बंदोबस्तात मंगळवारी सकाळी येथील झोपड्या हटविण्यात आल्या आहेत. येत्या पावसाळ्यापूर्वी संरक्षक भिंत बांधून पूर्ण करण्याचे लक्ष्य पालिकेने ठेवले आहे़ या कारवाईवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यात आला.
सन २००५ मध्ये मुंबईत झालेल्या अतिवृष्टीत पश्चिम उपनगरातील नद्या भरून वाहिल्या होत्या. दहिसर नदीने धोक्याची पातळी ओलांडून आसपासचे परिसर पाण्याखाली गेले होते. बोरीवली पूर्व परिसरातून वाहणाºया या नदीलगतच्या परिसरांनाही पुराचा फटका बसला होता. त्यामुळे ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांतर्गत मुंबईतील नदी-नाल्यांच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले. मात्र अनेक ठिकाणी नाले व नद्यांच्या परिसरात अतिक्रमण असल्याने रुंदीकरणाचे काम
रखडले.
बोरीवली पूर्व येथील सुधीर फडके उड्डाणपुलाखाली आणि दहिसर नदीलगत संरक्षक भिंत बांधण्यात व नदीची साफसफाई करण्यात अडथळा ठरणारी ९५ अनधिकृत बांधकामे अखेर पोलीस बंदोबस्तात पाडण्यात आली आहेत. तब्बल दीडशे पोलिसांचा ताफा, १९० पालिका कर्मचारी-अधिकारी या कारवाईसाठी घटनास्थळी तैनात होते. नदीचे रुंदीकरण व संरक्षक भिंतीमुळे यंदाच्या पावसाळ्यात या परिसरातील पाण्याचा निचरा जलद गतीने होईल, असा विश्वास सहायक आयुक्त भाग्यश्री कापसे यांनी व्यक्त केला.
येत्या पावसाळ्यात होणार काम पूर्ण!
च्या कारवाईनंतर पालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागामार्फत नदीकिनारी संरक्षक भिंत बांधणे, तसेच नदीचे रुंदीकरण व खोलीकरणदेखील केले जाणार आहे. हे काम येत्या पावसाळ्यापूर्वी होणे अपेक्षित आहे. या कारवाईला स्थानिक झोपड्यांमधून तीव्र विरोध होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यावर देखरेख ठेवण्यासाठी पालिकेने ड्रोन कॅमेºयाचा वापर केला होता़
च्दहिसर नदीकिनारी ७३८ फूट लांबीची संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरू आहे. यापैकी ३७७ फुटांची भिंत यापूर्वीच बांधण्यात आली आहे. मात्र या नदीलगत असणाºया संजयनगर व हनुमाननगर या परिसरातील ९५ बाधित झोपड्यांमुळे उर्वरित ३६१ फूट लांबीची संरक्षक भिंत बांधण्याचे काम प्रलंबित होते.

Web Title: After ten years, the path to widening the Dahisar River is open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.