मुंबई : नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुलातील ८६४ पुनर्वसन घरांचे आता वितरण सुरू झाले असतानाच वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पअंतर्गत ८४५ घरांचे बांधकाम पूर्ण झाले असून, महिनाभरात घरांचा ताबा देण्याचे नियोजन म्हाडाने केले आहे. वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पअंतर्गत ५५६ पुनर्वसन घरांचा ताबा यापूर्वीच देण्यात आला आहे.वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प अंतर्गत एप्रिलमध्ये ८४३, मे मध्ये ५७४, जुलैमध्ये २७१ अशा एकूण २२४६ सदनिका या वर्षअखेरीस वितरित करण्याचे नियोजन आहे. नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात मे-२०२६ मध्ये ५३७ पुनर्वसन सदनिका वितरित करण्याचे तर परळ येथील ५४७ पुनर्वसन सदनिका जून - २०२६, तर ऑक्टोबर - डिसेंबर २०२६ मध्ये ३४२ सदनिकांचे वितरण प्रस्तावित आहे.
प्रकल्पाच्या कामांना गतीडिसेंबर २०२६ पर्यंत म्हाडातर्फे तीनही प्रकल्पांतील ४८८८ पुनर्वसन सदनिकांचा ताबा देण्याचे नियोजन आहे.डिसेंबर २०२७ पर्यंत तीनही बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील ६२४६ पुनर्वसन सदनिकांचा ताबा देण्याचे नियोजन आहे.तिन्ही बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील १५,५९३ पुनर्वसन सदनिकांची उभारणी पूर्ण करून सदनिकांचा ताबा डिसेंबर २०२९ पर्यंत देण्याचे नियोजन आहे.
पुनर्वसन सदनिकांचे काम प्रगतिपथावरवरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात ४ हजार ८९३, नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात १ हजार ७४, ना.म. जोशी मार्ग पुनर्विकास प्रकल्पात १ हजार ५८२ अशा एकूण ७ हजार ५५० पुनर्वसन सदनिका बांधण्याचे काम प्रगतिपथावर आहे. तीनही बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात ९ हजार ८१५ पुनर्वसन सदनिकांचे बांधकाम प्रगतिपथावर असून, एकूण ६३ टक्के काम झाले आहे.
उर्वरित कामांचे नियोजन तीनही बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात ऑक्टोबर २०२६ मध्ये उर्वरित ५७७८ पुनर्वसन सदनिकांच्या बांधकामाला सुरुवात करण्याचे नियोजन आहे.
Web Summary : Following Naigaon, 845 Worli BDD chawl homes are complete, with possession planned within a month. Earlier, 556 homes were handed over. Mhada aims to distribute 4,888 homes by December 2026 and complete 15,593 homes by December 2029 across three projects.
Web Summary : नायगांव के बाद, वर्ली बीडीडी चॉल के 845 घर तैयार हैं, कब्जा एक महीने में। पहले 556 घर सौंपे गए। म्हाडा का लक्ष्य दिसंबर 2026 तक 4,888 घर वितरित करना और दिसंबर 2029 तक तीन परियोजनाओं में 15,593 घर पूरे करना है।