विनयभंगानंतर तरूणीच्या पालकांना मारहाण

By Admin | Updated: January 23, 2015 01:56 IST2015-01-23T01:56:14+5:302015-01-23T01:56:14+5:30

कुर्ल्याच्या कसाईवाडा परिसरातील तरूणांच्या सराईत टोळीने महाविद्यालयीन तरूणीची छेड काढलीच पण याचा जाब विचारण्यासाठी आलेल्या तिच्या आई-वडलांनाही मारहाण केली.

After the molestation, the teenage parents beat them | विनयभंगानंतर तरूणीच्या पालकांना मारहाण

विनयभंगानंतर तरूणीच्या पालकांना मारहाण

मुंबई : कुर्ल्याच्या कसाईवाडा परिसरातील तरूणांच्या सराईत टोळीने महाविद्यालयीन तरूणीची छेड काढलीच पण याचा जाब विचारण्यासाठी आलेल्या तिच्या आई-वडलांनाही मारहाण केली. मारहाणीनंतर पालकांसह या तरूणीने चुनाभटटी पोलीस ठाणे गाठले. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. तर दुसरीकडे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्याचे समजते.
अ‍ॅसीड अटॅकची धमकी
या तरूणीच्या जबाबानुसार ही टोळी गेल्या अनेक दिवसांपासून तिची छेड काढत होते. मात्र हा प्रकार घरी किंवा पोलिसांना सांगितलास तर अ‍ॅसीडने चेहेरा विद्रुप करू, अशी धमकी दिल्याने तरूणी घाबरली आणि तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. आई वडिलांनी मागोवा घेतला असता, कसाईवाडा, स्मशानभुमीजवळ उभ्या टोळक्याने तिची छेड काढली. तेव्हा सर्व प्रकार आईच्या लक्षात आला. तिने प्रतिकार करताच टोळक्याने आई-वडिलांना मारहाण केली. (प्रतिनिधी)

Web Title: After the molestation, the teenage parents beat them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.