Join us  

Video : खळबळजनक! लिंबू सरबतवाल्यानंतर आता इडलीवाल्याने चटणीसाठी वापरलं शौचालयातलं पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2019 5:33 PM

सोशल मीडियावर वायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हा इडलीवाला हे पाणी शौचालयमधील नसल्याचं सांगत आहे.

ठळक मुद्देइडलीवाला चटणी तयार करण्यासाठी  शौचालयामधील पाणी वापरत असल्याचं समोर आल्याने या इडलीवाल्यावर काय कारवाई होणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.  या सर्व प्रकाराची गंभीर दखल अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) घेतली आहे.

मुंबई - कुर्ला रेल्वे स्थानकातील अस्वच्छ पाण्याचे लिंबू सरबत या घटनेनंतर आता एका इडलीवाल्याने चक्क  शौचालयामधील पाणी चटणी बनवण्यासाठी वापरल्याचे समोर आलं आहे. पश्चिम रेल्वेच्या बोरिवली स्थानकाबाहेरील इडली आणि मेदूवडा विकणाऱ्या इडलीवाल्याने चटणीकरीता चक्क  शौचालयाच्या पाण्याच वापर केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाल्यावर पुन्हा एकदा रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या दर्जा आणि नागरिकांच्या आरोग्यास घातक असलेले अन्नपदार्थ यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. 

सोशल मीडियावर वायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हा इडलीवाला हे पाणी शौचालयमधील नसल्याचं सांगत आहे. मात्र, सत्यस्थिती आपण व्हिडिओत पाहताच, या व्हिडिओमध्ये तो शौचालयमधलं पाणी कॅनने आणून भरताना आणि तेच पाणी वापरताना स्पष्ट दिसून येत आहे. बोरिवलीतील अनेक प्रवासी सकाळी नाश्ता करण्यासाठी या इडलीवाल्याकडून इडली आणि मेदूवडा घेऊन खातात. हा इडलीवाला  शौचालयाचं पाणी वापरून नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळत आहे. या सर्व प्रकाराची गंभीर दखल अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) घेतली आहे. एफडीए या प्रकाराची चौकशी करत आहे. त्याचप्रमाणे इडलीवाला चटणी तयार करण्यासाठी  शौचालयामधील पाणी वापरत असल्याचं समोर आल्याने या इडलीवाल्यावर काय कारवाई होणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

टॅग्स :अन्न व औषध प्रशासन विभागअन्नपाणी