Join us
Daily Top 2Weekly Top 5

गावस्कर, सचिन, विराटनंतर क्रिकेटचा पुढील स्टार पनवेलमधून - दिलीप वेंगसरकर

By वैभव गायकर | Updated: April 27, 2025 18:53 IST

पनवेलमधील आंतराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट अकादमीचे मंत्री अशीच शेलार यांच्या हस्ते उदघाटन

वैभव गायकर,पनवेल: भारतात सुनील गावस्करांच्या नंतर सचिन तेंडुलकर स्टार बनले सध्याच्या घडीला विराट कोहली क्रिकेटस्टार आहेत.मात्र पुढील काळात भारतासाठी खेळणारा स्टार पनवेल मधील असेल असा विश्वास भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी पनवेल पालिकेच्या माध्यमातुन विकसित करण्यात आलेल्या आंतराष्ट्रीय दर्जाच्या क्रीकेट अकादमीच्या उदघाटना प्रसंगी काढले.दि.27 रोजी या भव्य क्रीकेट अकादमीचे उदघाटन माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाला दिलीप वेंगसरकर ,खासदार श्रीरंग बारणे ,आ.प्रशांत ठाकूर,आ.विक्रांत पाटील,आ.महेश बालदी,सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख,पनवेल पालिका आयुक्त मंगेश चितळे,माजी महापौर डॉ कविता चौतमोल,माजी सभागृह नेते परेश ठाकूर,माजी विरोधीपक्ष नेते प्रीतम म्हात्रेभाजप नेते बाळासाहेब पाटील यांच्यासह क्रिकेट मोठ्या प्रमाणात क्रिकेट प्रशिक्षक ,रसिक तसेच पनवेलकर उपस्थित होते.

यावेळी आंतराष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या उभारणीबाबत मंत्री आशिष शेलार यांनी पालिकेचे कौतुक करीत .हि क्रिकेट अकादमी एक नंबर असल्याचे सांगितले.याठिकाणहून आंतराष्ट्रीय विमानतळ अवघ्या 4 किमीवर असल्याने भविष्यात आंतराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटपट्टू नेट प्रॅक्टिससाठी पनवेल मध्ये याठिकाणी येतील असेही शेलार म्हणाले.तसेच मैदानाच्या एकाबाजूला काही तांत्रिक कारणामुळे काम अर्धवट राहिल्याने सिडकोच्या माध्यमातुन लवकरात लवकर याबाबत तोडगा काढावा अशा सूचना सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांना केल्या.यावेळी आ.प्रशांत ठाकुर यांनी सिडकोने 95 गावांच्या जमिनी संपादित केल्या मात्र याठिकाणी ग्रामस्थांना खेळण्यासाठी अथवा कार्यक्रमासाठी एखादे मैदान असावे अशी मागणी सिडको सहव्यवस्थापकीय संचालकाकडे केली.

तसेच अटल सेतूमुळे पनवेल मुंबईला जोडले गेले आहे.यामुळे क्रिकेट अकादमीमुळे निश्चितच येथील खेळाडूंना मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले असून मुंबई,पिंपरी चिंचवड मध्ये मोठ्या प्रमाणात खेळाडू घडले तसेच खेळाडू पनवेल मध्ये देखील वेंगसरकर यांच्या मार्गदर्शनात घडतील असा विश्वास व्यक्त करीत पूर्वाश्रमीचे आयुक्त गणेश देशमुख आणि आयुक्त मंगेश चितळे यांचे कौतुक केले.आ.विक्रांत पाटील यांनी शहराचा विकास प्लॅनिंग ने होणे गरजेचे आहे.विकासाबरोबर कला,क्रीडा आणि सांस्कृकी कामे होणे देखील तेवढेच गरजेचे असल्याचे सांगत.गणेश देशमुख यांच्या रूपाने पनवेलला चांगला फलंदाज मिळाल्याने त्यांनी चौफेर फटकेबाजी करीत पनवेलच्या विकासाचा पाया रचल्याचे सांगितले. या क्रिकेट अकादमीत 50 खेळाडू पालिका हद्दीत 25 जिल्ह्यातील तसेच 25 जिल्ह्याबाहेरील अशा 100 खेळाडूंना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

आदिवासी खेळाडू घडतीलमी पनवेल मध्ये 30 वर्षापासून येतो.माझा वाजेपुर येथे घर आहे.क्रिकेट अकादमी विकसित झालेल्या जागेवर माझ लक्ष असायचे याठिकाणी वाहनांची पार्किंग,पडीक वाहने उभी असायची याबाबत मी तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख,आ.प्रशांत ठाकूर यांच्याशी चर्चा केली.त्यांनी देखील सकारात्मकता दाखविल्याने आज हि भव्य क्रिकेट अकादमी उभी राहिली आहे.पनवेल मध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिभावंत क्रिकेट खेळाडू आहेत.त्यामध्ये आदिवासी मुलांचा देखील समावेश असुन भविष्यात आदिवासी क्रिकेटपट्टू देखील याठिकाणी घडतील.

अशी आहे क्रिकेट अकादमी29899 चौ मी क्षेत्रफळ150 मीटर व्यासाचे क्रिकेट मैदानस्वागत कक्षफिजिओथेरपी रूमहोम टीम ड्रेसिंग रूमबाह्य संघ ड्रेसिंग रूमचेंजिंग रूमशौचालयशॉवर रूम31 कार  ,40 दुचाकी ,2 बस पार्किंग व्यवस्था

टॅग्स :पनवेलआशीष शेलार