पाच वर्षांनंतर मायलेकीची पुनर्भेट

By Admin | Updated: February 7, 2015 23:14 IST2015-02-07T23:14:15+5:302015-02-07T23:14:15+5:30

डोंबिवलीतील हरवलेल्या आठवर्षीय मोनिकाला अडीच वर्षांनंतर मायेचे छत्र मिळाल्याची घटना ताजी असतानाच नवी मुंबईतील दहावर्षीय नंदिनी आणि तिच्या आईची (कल्पना) पाच वर्षांनंतर पुनर्भेट झाली आहे.

After five years, the return to Mylakeki | पाच वर्षांनंतर मायलेकीची पुनर्भेट

पाच वर्षांनंतर मायलेकीची पुनर्भेट

ठाणे : डोंबिवलीतील हरवलेल्या आठवर्षीय मोनिकाला अडीच वर्षांनंतर मायेचे छत्र मिळाल्याची घटना ताजी असतानाच नवी मुंबईतील दहावर्षीय नंदिनी आणि तिच्या आईची (कल्पना) पाच वर्षांनंतर पुनर्भेट झाली आहे. ही भेट ठाणे शहर पोलिसांच्या चाइल्ड्स प्रोटेक्शन युनिटमुळे शक्य झाली आहे. मात्र, तिला तिच्या आईने घरातील बिकट परिस्थितीमुळे एका मैत्रिणीच्या मदतीने पाच वर्षांपूर्वी आश्रमात सोडल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
ठाण्यातील वर्तकनगर येथील आश्रमशाळेत असलेल्या २४ मुलींच्या पालकांचा ठाणे चाइल्ड्स प्रोटेक्शन युनिट शोध घेत आहे. जानेवारी महिन्यात डोंबिवलीतील मोनिका हिच्यापाठोपाठ नवी मुंबईतील नंदिनीची आणि तिच्या आईची पुनर्भेट घडली आहे. आश्रमात राहून महापालिकेच्या शाळेत इयत्ता पाचवीत नंदिनी चंद्रकांत जाधव शिकत आहे. तिच्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक कमालउद्दीन शेख यांच्या पथकातील पोलीस हवालदार प्रतिमा मनोरे आणि पोलीस नाईक रोहिणी सावंत यांनी नवी मुंबई, घणसोली येथील तिचे घर गाठले. मात्र, तिची आई तेथे राहत नसून ती ऐरोली सेक्टर-६ येथील रुग्णालयात काम करीत असल्याचे सांगण्यात आले. तेथे गेल्यावरही पोलिसांना तिच्या दिघा येथील नवीन घराचा पत्ता मिळाला. अशा प्रकारे पोलिसांनी तिच्या आईचा शोध घेत मायलेकीची भेट घडवून आणली. त्या वेळी नंदिनीच्या आईची चौकशी केली असता पतीच्या निधनानंतर घरची बिकट परिस्थिती निर्माण झाल्यानंतर एका ख्रिश्चन मैत्रिणीच्या मदतीने नंदिनीला आश्रमशाळेत सोडल्याचे तिने पोलिसांना सांगितले. मात्र, दोन महिन्यांवर वार्षिक परीक्षा आली आहे. त्यानंतरच तिला तिच्या आईच्या ताब्यात दिले जाणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांनी लोकमतला सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: After five years, the return to Mylakeki

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.