After the assurance, the movement of government medical college doctors was stopped | आश्वासनानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयीन डॉक्टरांचे आंदाेलन मागे

आश्वासनानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयीन डॉक्टरांचे आंदाेलन मागे

मुंबई : राज्यातील सर्व शासकीय, वैद्यकीय महाविद्यालयांमधील आणि रुग्णालयांतील डॉक्टरांनी विविध मागण्यांसाठी गुरुवारी कामबंद आंदाेलन केले.  मात्र आश्वासनानंतर आंदाेलन मागे घेतले. 
वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, वैद्यकीय अध्यापक संघटनेचे डॉ. सचिन मुळकूटकर व डॉ. गोलावार, वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या डॉ. रेवत कवींदे आदींसाेबत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी गुरुवारी व्हिडीओ  काॅन्फरन्सिंगने बैठक घेतली. यावेळी या महाविद्यालयांतील सहाय्यक प्राध्यापक व वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित वेतन श्रेणीनुसार वेतनाचा प्रस्ताव तातडीने सादर करा, ज्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा दोन वर्षे झाली त्यांच्या सेवा कायम करण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करा, असे निर्देश त्यांनी  दिले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: After the assurance, the movement of government medical college doctors was stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.