गौरी विसर्जनानंतर भाजीपाल्याचे भाव घसरले

By Admin | Updated: September 6, 2014 23:08 IST2014-09-06T23:08:20+5:302014-09-06T23:08:20+5:30

गौरी-गणपतीच्या सणाला पालेभाजी व फळभाज्यांना बाजारात चांगली मागणी असल्याने त्यांचे भाव वाढलेले असतात. यंदा पावसाने जोर कायम ठेवल्याने भाज्यांचे भाव गडगडले होते.

After the absence of Gauri, vegetable prices declined | गौरी विसर्जनानंतर भाजीपाल्याचे भाव घसरले

गौरी विसर्जनानंतर भाजीपाल्याचे भाव घसरले

जान्हवी मोर्ये - ठाणो
गौरी-गणपतीच्या सणाला पालेभाजी व फळभाज्यांना बाजारात चांगली मागणी असल्याने त्यांचे भाव वाढलेले असतात. यंदा पावसाने जोर कायम ठेवल्याने भाज्यांचे भाव गडगडले होते.  पावसामुळे माल सडण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे बाजारात मालाला उठावच मिळाला नाही. गणोश चतुर्थीच्या आदल्या दिवशी जो भाव होता तो गौरी पूजनाच्या दिवशी एकदम 1क् टक्के खाली घसरल्याचे चित्र बाजारात आहे. 
भाजीपाला मालाची आवक घटली नसली तरीही हा बाजार भाव घसरला आहे. यामुळे भाज्यांच्या किंमतीत घट झाली आहे. त्यामुळे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत 28 ऑगस्ट रोजी साडे तीन हजार  रुपये  क्विंटलने मिळणारी हिरवी मिरची आता तीन  हजार 25क् रुपयांवर आली आहे. 18क् रुपयांना दहा किलो मिळणारी ढोबळी मिरची आता 16क् वर आली आहे.  भेंडी 18क् रूपयांवरुन 16क् वर आली आहे. दूधी भोपळा 19क् वरुन आता 17क् रूपयांवर आला आहे. डांगर 9क् रूपयांवरून 8क् वर आला आहे. फ्लॉवरमध्येही 5क् रुपयांची घट आली असून 5क्क् रूपयांवरून दहा किलोला आता 45क् चा भाव आकारला जात आहे. गवार 35क् वरू न 32क् रुपयांवर आली आहे. घेवडा 25क् रूपयांवरून 225 रूपयांवर आला आहे. वांगी 18क् रूपयांना मिळत होती ती आता 17क् रूपयांना मिळत आहे. टॉमेटो 16क् रूपयांना मिळत होती ते आता 155 रूपयांना मिळत आहे. मटार 45क् रूपयांवरून 425 वर आले आहेत.  18क् प्रति दहा किलोने मिळणारे कारले आता 17क् रूपयांना झाले आहे.  28क् रूपयांची तोंडली 25क् वर आली आहेत. सूरण 16क् रूपयांना मिळत होते ते आता 155 रूपयांना मिळत आहे. शेवगा 35क् रूपयांना मिळत होता तो आता 33क् रूपयांवर आला आहे. गाजर 29क् रूपयांवरून 26क् वर आला आहे. काकडीचा भाव  1क्क् वरुन 9क् रूपये झाला आहे. कोबीच्या भावात मात्र कोणताही बदल झालेला नसल्यामुळे तो 8क् रूपयांना च विकाला जात आहे.तर पालेभाज्यांमध्ये  मेथीचा दर 1क्क् नगाला 1 हजार 9क् रूपयांवरुन एक हजार रुपये इतका झाला आहे. पालकाचा दरही  1क्क् रुपयांनी घसरला आहे. त्यामुळे  एक हजारांना मिळणारे पालकाचे 1क्क् नग आता 9क्क् रूपयांना विकले जातात. मूळा 2 हजार रूपयांना मिळत होता तो आता 18क्क् रूपयांना विकला जातो.शेपू 12क्क् रूपयांवरुन एक हजारांवर घसरला आहे. कादयाची पातही दोन हजारांवरुन  18क्क् रूपये झाली आहे. कोथिंबीर एक हजार रूपये दराने विकली गेली होती, ती आता 9क्क्  रूपये दराने विकली जात आहे. 
भाजीपाला विक्रेते रामदास यादव यांनी सांगितले की, गणोशोत्सवात भाजी पाल्यांला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र व्यापा:यांच्या आशेवर पावसाने चांगलेच पाणी फेरले. गणोशोत्सवाच्या आदल्या दिवशीच्या भाजी पाल्याच्या दरात गौरी पूजनाला 1क् टक्यांनी  घट दिसून आली. पावसामुळे बाजार पडला व्यापा:यांवर माल फेकून देण्याची वेळ आली 
 
बाजारात दररोज 1क्क् ते 14क् ट्रक भाज्यांचा माल येतो. गणोशोत्सवाच्या आदल्या दिवशी भाजीपाल्याची पाऊण कोटी ते एक  कोटी रूपयांची उलाढाल झाली. मालाची आवक घटलेली नाही, तरीही  बाजार भाव मात्र घसरला आहे, असे बाजार समितीचे अधिकारी यशवंत पाटील यांनी सांगितले.

 

Web Title: After the absence of Gauri, vegetable prices declined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.