Join us  

9 दिवसांनी अखेर आकसा बीच पर्यटकांसाठी झाला सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 9:55 AM

सुट्टी व शनिवार आणि रविवारी येथे सुमारे 5000 पर्यटक येतात.या बीचची ओळख हादसा बीच म्हणतात.कारण 1999 पासून 2014 पर्यंत या बीचवर 90 हुन अधिक पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला.

मनोहर कुंभेजकर

मुंबई--मुंबईतील डेंजरस बीच म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालाड पश्चिम येथील आकसा बीच काल दुपारी 2 नंतर पर्यटकांसाठी मालवणी पोलिसांनी सुरू केला.त्यामुळे येथील पर्यटकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. वायू वादळ मुंबईत आल्याच्या धर्तीवर आणि सुरक्षेचा उपाय म्हणून बुधवार दि,12 जून ते 20 जून दुपारी 2 पर्यंत तब्बल 9 दिवस मालवणी पोलिसांनी या बीचच्या बॅरिकेट्स टाकून बीचवर पर्यटकांना येण्यास मज्जाव केला होता. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड झाला होता. सुमारे 9 दिवस बीच बंद राहण्याची ही पहिलीच वेळ असल्याची माहिती येथील पर्यटकांनी दिली.

सुट्टी व शनिवार आणि रविवारी येथे सुमारे 5000 पर्यटक येतात.या बीचची ओळख हादसा बीच म्हणतात.कारण 1999 पासून 2014 पर्यंत या बीचवर 90 हुन अधिक पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला. याबाबत मालवणी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक पतंगरे यांनी सांगितले की,हवामान खात्याने वायू वादळाच्या दिलेल्या धोक्याच्या इशाऱ्याने आणि विशेष म्हणजे येथे येणाऱ्या पर्यटकांची सुरक्षितता महत्वाची असल्याने हा बीच बंद ठेवण्यात आला होता.पर्यटक हे जीवरक्षकांचे सुद्धा ऐकत नाहीत,अनेकवेळा मद्यपान करून ते पाण्यात जातात.आणि दुर्दैवाने त्यांचा बुडून मृत्यू होता. गेल्या 10 दिवसात आकसा सोडून इतर बीचेसवर 6 पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला होता अशी माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :मुंबईपोलिस