तब्बल ४ महिन्यानंतर मुख्य बाजारपेठ गजबजली, गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी नागरीकांनी केली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2020 03:05 PM2020-08-15T15:05:12+5:302020-08-15T15:06:11+5:30

शहरातील मुख्य बाजारपेठ तसेच इतर ठिकाणचे मार्केट शनिवार पासून पुन्हा एकदा खुली झाली आहेत. त्यामुळे नागरीकांनी पहिल्याच दिवशी गणेशोत्सवाच्या साहित्य खरेदीसाठी काहीशी गर्दी केल्याचे दिसत होते. परंतु नागरीकांनी तोंडाल मास्क वापरावा, गर्दी करु नये असे आवाहन पोलीस आणि पालिकेच्या वतीने करण्यात येत होते.

After 4 months, the main market was bustling, citizens crowded for Ganeshotsav shopping | तब्बल ४ महिन्यानंतर मुख्य बाजारपेठ गजबजली, गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी नागरीकांनी केली गर्दी

तब्बल ४ महिन्यानंतर मुख्य बाजारपेठ गजबजली, गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी नागरीकांनी केली गर्दी

Next

ठाणे : तब्बल ४ महिन्यानंतर ठाणे शहरातील मुख्य बाजारपेठ शनिवार पासून पुन्हा गजबजेलेली दिसून आली आहे. चार महिन्यानंतर बाजारेपेठा दिवसभर खुल्या करण्यात आल्याचे पालिकेने स्पष्ट केले. त्यानुसार शनिवारी पहिल्याच दिवशीच ठाणेकर नागरीकांनी शहरातील मुख्य बाजारपेठेत गणेशोत्सवाच्या साहित्य खरेदी करण्यासाठी काहीशी गर्दी केल्याचे दिसून आले. त्यामुळे मार्केटमधील ही गर्दी टाळण्यासाठी पोलीस आणि पालिकेच्या माध्यमातून येथे तसेच शहरातील इतर मार्केट परिसरातही नागरीकांनी गर्दी करु नये, सोशल डिस्टेसींगचे पालन करावे अशा घोषणा दिल्या जात होत्या.
                    कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे शहरातील मुख्य बाजारपेठेबरोबर शहरातील इतर ठिकाणचे मार्केटही बंद होते. तर अनलॉक जाहीर झाल्यानंतर सम आणि विषम तारखेला रस्त्याच्या एका बाजूकडील आणि दुसऱ्या दिवशी दुसºया बाजूकडील दुकाने खुली होती. परंतु मुंबईत ५ आॅगस्ट पासून सर्वच दुकाने खुली करण्यात आल्यानंतर ठाण्यातील दुकाने देखील खुली करण्यात यावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी महापालिकेकडे लावून धरली होती. त्यानुसार दोन दिवसापूर्वी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महापालिकेत झालेल्या बैठकीत दुकाने खुली करण्यावर एकमत झाले आणि त्यानुसार १५ आॅगस्ट पासून सकाळी ९ ते सांयकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने खुली करण्यात आली आहेत.
दरम्यान येत्या एक आठवड्यावर गणेशोत्सव आला आहे. कोरोनाचे सावट जरी असले तरी नागरीक गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणार आहेत. त्यामुळे बाजारपेठ जशी खुली झाली तशी शनिवारी सकाळ पासून शहरातील मुख्यबाजारपेठेत नागरीकांनी गणेशोत्सवाच्या साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले. तर दुकान दारांकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टेसींगचे पालन केले जात होते. दुकानात येणाºया प्रत्येकासाठी सॅनिटायझर बंधनकारक करण्यात आले होते. परंतु गणेशोत्सावच्या अनुषगांने नागरीकांनी जास्तीची गर्दी करु नये यासाठी पोलीस प्रशासन आणि पालिकेच्या माध्यमातून नागरीकांना खरबदारीच्या सुचना दिल्या जात होत्या. या पाशर््वभूमीवर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील सर्व गर्दीची ठिकाणी, मार्केट परिसर याठिकाणी गर्दी होवू नये, मास्कचा वापर करावा यासाठी जाहिर घोषणा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या पाशर््वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सर्व प्रभाग समितीतंर्गत जाहिर घोषणा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शनिवार पासून महापालिका परिसरात सर्व प्रभाग समतिीतंर्गत जाहीर घोषणा देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. सकाळी आणि दुपारनंतर संध्याकाळपर्यंत दोन सत्रांत जाहीर घोषणा देण्यात येणार असून नागरिकांनी गर्दी करू नये, मास्क लावूनच बाहेर पडावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
 

Web Title: After 4 months, the main market was bustling, citizens crowded for Ganeshotsav shopping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.