विराथन बुदू्रक ग्रा.पं.चे ११ सदस्य बाद

By Admin | Updated: April 18, 2015 23:20 IST2015-04-18T23:20:36+5:302015-04-18T23:20:36+5:30

जिल्हाधिकाऱ्याने सर्व सदस्यांना पाच वर्षाच्या मुदतीकरीता सदस्य म्हणून राहण्यास किंवा निवडणूक लढविण्यास बाद ठरविले आहे.

After 11 members of Aranan Budruk G.P. | विराथन बुदू्रक ग्रा.पं.चे ११ सदस्य बाद

विराथन बुदू्रक ग्रा.पं.चे ११ सदस्य बाद

पालघर : सफाळे येथील विराथन बुद्रुक ग्रामपंचायतमध्ये निवडून आलेल्या ११ सदस्यांनी निवडणुकीनंतर मुदतीमध्ये निवडणूक खर्चाचा तपशील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केला नसल्याने जिल्हाधिकाऱ्याने सर्व सदस्यांना पाच वर्षाच्या मुदतीकरीता सदस्य म्हणून राहण्यास किंवा निवडणूक लढविण्यास बाद ठरविले आहे.
विराथन बुदू्रक ग्रामपंचायतीची निवडणुका २४ मे २०१२ मध्ये पार पडीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि बहुजन विकास आघाडीचे अकरा सदस्य निवडून येत. सरपंचपदी सुनंदा रमणीक घरत यांची निवड करण्यात आली होती. ग्रामपंचायतीची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी करावयाच्या खर्चाच्या मर्यादा राज्यनिवडणूक आयोगाने निश्चित केले असून उमेदवारांनी आपल्या निवडणूक खर्चाच्या हिशोबाची विवरणे निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एका महिन्याच्या आत दाखल करावीत असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिलेले आहेत. असे असताना निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर विरायन, बुदू्रक ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेले श्रीकांत स. भोईर, पल्लवी प. भोईर, सुनंदा र. घरत, राहुल र. घरत, मिलिंद ल. किणी, निलीमा अ. घरत, भुपेंद्र सु. भोईर, छाया सु. भोईर, वंदना ग. पाटील, मनाली म. घरत, दत्तात्रेय दि. पाटील इ. अकरा सदस्यांनी निवडून आल्यानंतर आपल्या निवडणूक खर्चाचा तपशील सादर करण्यास उशीर केल्याने त्यांच्या विरोधात माजी उपसरपंच लक्ष्मण काच्या किणी यांनी तक्रार दाखल केली होती. काल पालघरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अभिजीत बांगर यांनी याप्रकरणी कलम १४ ब अन्वये वरील ११ सदस्यांना पाच वर्षाच्या कालावधीकरीता ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहण्यास किंवा सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास निरर्ह ठरविण्यात येत असल्याचे जाहीर करीत असल्याचा निर्णय दिला. (वार्ताहर)

Web Title: After 11 members of Aranan Budruk G.P.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.