बहलविरोधात पीडितेचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 05:50 IST2018-10-26T05:50:42+5:302018-10-26T05:50:49+5:30
लैंगिक शोषण प्रकरणी गेल्या सुनावणीत पीडितेने न्यायालयात उपस्थित राहण्यास नकार दिल्याने व तिने हे प्रकरण आपल्याला अधिक ताणायचे नसल्याचे वकिलामार्फत न्यायालयाला कळविल्यानंतर बहल यांच्या वकिलांनी पीडितेने खोटे आरोप केल्याचा आरोप केला.

बहलविरोधात पीडितेचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल
मुंबई : लैंगिक शोषण प्रकरणी गेल्या सुनावणीत पीडितेने न्यायालयात उपस्थित राहण्यास नकार दिल्याने व तिने हे प्रकरण आपल्याला अधिक ताणायचे नसल्याचे वकिलामार्फत न्यायालयाला कळविल्यानंतर बहल यांच्या वकिलांनी पीडितेने खोटे आरोप केल्याचा आरोप केला. बहलच्या या आरोपाचे खंडन करीत पीडितेने गुरुवारी उच्च न्यायालयात याबाबत प्रतिज्ञापत्र सादर केले.
बहल याने आपले लंैगिक शोषण केले, असे संबंधित पीडितेने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. हे प्रतिज्ञापत्र न्या. एस. जे. काथावाला यांच्या खंडपीठापुढे दाखल करण्यात आले. फँटम फिल्म्स कंपनीच्या पीडित महिला कर्मचारीने बहलविरोधात लैंगिक अत्याचाराचे आरोप केल्यानंतर अनुराग कश्यप व अन्य काहींनी याबाबत बहलवर सोशल साईटवरून टीका केली. त्यामुळे या सर्वांवर बहल याने १० कोटींचा अब्रूनुकसान-भरपाईचा दावा केला. या दाव्यावरील सुनावणीत पीडितेने न्यायालयासमोर येण्यास नकार दिला. त्या वेळी न्यायालयानेही पीडितेवर नाराजी व्यक्त केली होती. न्यायालयाने या दाव्यावरील अंतिम सुनावणी २१ नोव्हेंबर रोजी ठेवली आहे.