टीव्हीवर जाहिरातींचा भडिमार
By Admin | Updated: October 12, 2014 00:55 IST2014-10-12T00:55:26+5:302014-10-12T00:55:26+5:30
निवडणुकीला अवघे दोन दिवस शिल्लक असताना टीव्हीवरून ‘पंचरंगी’ जाहिरातींचा भडिमार मतदारांवर होत आहे.

टीव्हीवर जाहिरातींचा भडिमार
>मुंबई : निवडणुकीला अवघे दोन दिवस शिल्लक असताना टीव्हीवरून ‘पंचरंगी’ जाहिरातींचा भडिमार मतदारांवर होत आहे. युती आणि आघाडीच्या फाटाफुटीनंतर विविध माध्यमांतून सर्वच पक्ष मतदारांना भुरळ घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र आता टीव्हीवरील जाहिरांतीमुळे मतदारराजा अक्षरश: हैराण झाला आहे.
शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपा या प्रमुख पक्षांनी प्रचाराकरिता व्हिडीओजच्या माध्यमातून टीव्हीवर आपल्या जाहिराती सुरू केल्या आहेत. त्यात मग जागरण, गोंधळापासून ते अगदी त्या त्या पक्षांनी केलेल्या कामांचा आणि भविष्यातील महाराष्ट्राचा आढावा घेण्यात आला आहे. व्हिडीओच्या माध्यमातून होणा:या प्रचारांमध्ये प्रत्येक पक्षाने वेगवेगळ्य़ा स्ट्रॅटेजीचे ‘लक्ष्य’ ठेऊन जाहिराती बनविल्या आहेत.
शिवसेनेने आपल्या ठरावीक मतदारांना डोळ्य़ासमोर ठेऊन मराठी संस्कृतीत लोककलांचा आधार घेतला आहे. त्यात कडकलक्ष्मी, जागरण, गोंधळ, बाल्या नृत्य इ. गोष्टींचा समावेश आहे. तर दोन दिवसांपूर्वीच मनसेने सुरू केलेल्या जाहिरातीत ‘हो, हे शक्य आहे’ म्हणत भविष्यातील महाराष्ट्राचे सुकर चित्र मतदारांसमोर ठेवण्यात येत आहे. भाजपाने तरुण वर्गाला आकर्षित करीत ‘स्मार्ट’ पद्धतीच्या जाहिराती तयार केल्या आहेत. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महाराष्ट्रात केलेल्या प्रकल्पांवर आपापला दावा करीत मतदारांना भुरळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. मतदानाचा दिवस जवळ आला असताना काही सेकंदांच्या फरकाने एकामागोमाग येणा:या जाहिरांतीचा मतदारांवर भडिमार सुरू आहे. या जाहिरातींना आता मतदार काहीसे कंटाळले असून, यातून मार्ग काढीत ‘एन्टरटेन्मेंट’ वाहिन्यांकडे त्यांचा मोर्चा वळला आहे.
राजकीय पक्षांच्या या जाहिरातींचा कंटाळा आला असून यामुळे ‘ओकारी’ येण्यासारखे वातावरण असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ सामाजिक कार्यकत्र्याने व्यक्त केली. तर या जाहिरांतीवर आपण आता काय बोलावे, निवडणुकीची थट्टाच मांडल्याचेही एका सामाजिक कार्यकत्याने सांगितले. (प्रतिनिधी)
राजकीय पक्षांच्या या जाहिरातींचा सध्या अतिरेकच सुरू आहे. आधीच संभ्रमावस्थेत असलेला मतदारराज जाहिरातींमुळे अधिकच हैराण झाला आहे.
- विजय कर्णिक, मतदार
राजकीय पक्षांनी प्रचारासाठी तयार केलेल्या जाहिरातींची थट्टा व्हावी एवढी वेळ या राज्यकत्र्यानी आणू नये. त्यापेक्षा या पक्षांनी विश्वासार्हता जपल्यास मतदारांना मत देणो अधिक सोपे होईल.
- सचिन मयेकर, मतदार