Join us

सुमारे तीन लाखांचे  भेसळयुक्त तूप जप्त; अन्न व औषध प्रशासन बृहन्मुंबई कार्यालयाची कारवाई

By स्नेहा मोरे | Updated: October 19, 2022 13:00 IST

दिवाळीच्या तोंडावर अन्न व औषध प्रशासन बृहन्मुंबई कार्यालयाने अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या तुपावर कारवाई केली आहे.

स्नेहा मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई: दिवाळीच्या तोंडावर अन्न व औषध प्रशासन बृहन्मुंबई कार्यालयाने अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या तुपावर कारवाई केली आहे. १८.१०.२०२२ रोजी मुंबई तील प्रशासनाच्या दक्षता विभागास प्राप्त माहितीच्या अनुषंगे  मस्जिद बंदर मधील मे. ऋषभ शुद्ध घी भांडार गोडाऊन , पहिला मजला, १५, श्रीनाथजी बिल्डिंग , केशवजी नाईकरोड, चिंचबंदर , मुंबई ०९ या अन्न आस्थापनेतील तीन तुपाचे अन्न नमुने विश्लेषणासाठी घेऊन  उर्वरित ४०० किलो  किमत रु २,९९,०९०/- किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. 

हे अन्न नमुने विश्लेषणासाठी पाठविण्यात आली असून ,विश्लेषण अहवालाच्या अनुषंगे पुढील आवश्यक कारवाई घेतली जाईल .दिवाळीसारख्या सणाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना सुरक्षित ,आरोग्यदाई व सकस अन्न पदार्थ उपलब्ध व्हावेत या करिता प्रशासनाने अन्न आस्थापनाच्या तपासण्या व अन्न नमुने तपासनिसाठी घेण्याची विशेष मोहीम हाती घेतली असल्याची तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्याकडे दुर्लक्ष करनाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची प्रशासनाचे सह आयुक्त (अन्न), श्री शशिकांत केकरे यनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :मुंबई