लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय नॅनोसायन्स आणि नॅनोटेक्नॉलॉजी केंद्राने २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी २६ मेपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे.
नॅनोसायन्स आणि नॅनोटेक्नॉलॉजी केंद्राने यावर्षी दोन वर्षांच्या एम. एससी. नॅनोसायन्स आणि नॅनोटेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमासोबतच बी. एससी. (ऑनर्स), बी. एससी. (ऑनर्स विथ रिसर्च) आणि पीजी डिप्लोमा (नॅनोसायन्स आणि नॅनोटेक्नॉलॉजी) हे नवीन अभ्यासक्रम सुरू केले आहेत. संबंधित शाखांतील बी. ई. आणि बी. टेक. विद्यार्थ्यांना एम. एससी. अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात थेट प्रवेशाची संधी आहे. इच्छुक बी. एस्सी., बी. ई. आणि बी. टेक. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेनुसार अर्ज करावेत, असे आवाहन केले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अंतिम सत्राची परीक्षा अद्याप दिली नाही किंवा ज्यांचे निकाल घोषित झालेले नाहीत, असे विद्यार्थी सुद्धा अर्ज करू शकणार आहेत.
विशेष शिक्षण आणि कौशल्य फायद्याचे ठरणार
नॅनोसायन्स आणि नॅनोटेक्नॉलॉजी हे क्षेत्र इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर, आरोग्य सेवा, ऊर्जा, जैवतंत्रज्ञान, औषधनिर्मिती, एरोस्पेस, प्रगत उत्पादन तंत्रज्ञान आणि शाश्वत विकास यांसारख्या अनेक उद्योगांमध्ये वेगाने परिवर्तन घडवत आहे.
अशा परिस्थितीत अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील विशेष शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण मोठ्या प्रमाणात लाभदायक ठरू शकेल. या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना नॅनोमटेरियल्स, स्मार्ट डिव्हाइसेस, सेन्सर्स, ऊर्जा साठवण प्रणाली, नॅनोमेडिसिन, नॅनो फॅब्रिकेशन आणि प्रगत विश्लेषण तंत्रज्ञानाचे सखोल ज्ञान मिळणार आहे.
Web Summary : Mumbai University's Nano Science and Nano Technology Centre begins admissions for 2026-27. New BSc, PG diploma courses are introduced. BE/B.Tech students can directly apply for M.Sc. second year. Application deadline is May 26th. Special skills in this field will be beneficial for students.
Web Summary : मुंबई विश्वविद्यालय के नैनो साइंस और नैनो टेक्नोलॉजी केंद्र ने 2026-27 के लिए प्रवेश शुरू किए। बीएससी, पीजी डिप्लोमा पाठ्यक्रम शुरू। बीई/बी.टेक छात्र सीधे एम.एससी. द्वितीय वर्ष में प्रवेश ले सकते हैं। आवेदन की अंतिम तिथि 26 मई है। इस क्षेत्र में विशेष कौशल छात्रों के लिए फायदेमंद होंगे।