सागरी मत्स्यव्यवसाय नौकानयन प्रशिक्षण वर्गास प्रवेश सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:05 IST2020-12-08T04:05:29+5:302020-12-08T04:05:29+5:30
मुंबई : वर्सोवा येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन, सागरी इंजिन देखभाल आणि परिचालन विषयाच्या १२५व्या प्रशिक्षण सत्राचे ...

सागरी मत्स्यव्यवसाय नौकानयन प्रशिक्षण वर्गास प्रवेश सुरू
मुंबई : वर्सोवा येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन, सागरी इंजिन देखभाल आणि परिचालन विषयाच्या १२५व्या प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण वर्गासाठी १६ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.
मत्स्यव्यवसाय व सागरी मासेमारीचा विकास आणि विस्तार होण्यासाठी मत्स्यव्यवसायातील इच्छुक प्रशिक्षणार्थींना सहा महिन्यांचे प्रशिक्षण शासकीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात दिले जाते. त्या अनुषंगाने २०२०-२१ या वर्षातील, १ जानेवारी ते ३० जून २०२१ या सहा महिन्यांच्या कालावधीत सागरी मत्स्यव्यवसाय नौकानयन, सागरी इंजिन देखभाल आणि परिचालन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक प्रशिक्षणार्थीनी विहित नमुना अर्ज आवश्यक कागदपत्रांसह शासकीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पांडुरंग रामले मार्ग, तेरे गल्ली, वर्सोवा मुंबई ६१ या पत्त्यावर १६ डिसेंबर, २०२० पर्यंत सादर करावेत, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.