अकरावीच्या विशेष फेरीत ५९ हजार ३२२ विद्यार्थ्यांना प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:07 AM2020-12-29T04:07:45+5:302020-12-29T04:07:45+5:30

ई-डब्ल्यूएस संवर्गातून चार हजार ६१३ जागा अलॉट : ३१ डिसेंबरपर्यंत घेता येणार प्रवेश लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अकरावी ...

Admission to 59 thousand 322 students in the special round of 11th | अकरावीच्या विशेष फेरीत ५९ हजार ३२२ विद्यार्थ्यांना प्रवेश

अकरावीच्या विशेष फेरीत ५९ हजार ३२२ विद्यार्थ्यांना प्रवेश

Next

ई-डब्ल्यूएस संवर्गातून चार हजार ६१३ जागा अलॉट : ३१ डिसेंबरपर्यंत घेता येणार प्रवेश

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अकरावी विशेष फेरी-१ ची गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर झाली. यामध्ये अर्ज केलेल्या ६८ हजार १७८ विद्यार्थ्यांपैकी ५९ हजार ३२२ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळाली. यामध्ये वाणिज्य शाखेचे ३५ हजार ४२३, कला शाखेचे चार हजार ४८७, विज्ञान शाखेचे १८ हजार ८१९ तर एचएसव्हीसी शाखेच्या ५९३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विशेष फेरीमध्ये निवड झालेले विद्यार्थी महाविद्यालयांत ३१ डिसेंबर सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवेश घेऊ शकतील.

विशेष फेरी-१ मध्ये चार हजार ६१३ विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस संवर्गातून अलॉटमेंट मिळाली. खुल्या प्रवर्गातून प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३९ हजार ३१२ आहे. विशेष फेरीत जागा अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये राज्य मंडळाचे तब्बल ५४ हजार ४७८ विद्यार्थी आहेत. सीबीएसई मंडळाचे एक हजार ७८३ तर आयसीएसई मंडळाचे २१५४ विद्यार्थी आहेत.

वाणिज्य शाखेच्या १८ हजार ७१४ विद्यार्थ्यांना, विज्ञान शाखेच्या १२ हजार ५८९ तर कला शाखेच्या ३४२५ विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले. चारही शाखा मिळून पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३५ हजार ३१४ आहे. तर, दुसऱ्या पसंतीचे महाविद्यालय एकूण नऊ हजार ३५७ विद्यार्थ्यांना मिळाले.

......................

शाखा - अर्ज केलेले विद्यार्थी - अलॉटमेंट मिळालेले विद्यार्थी

कला - ४६३२- ४४८७

वाणिज्य - ४२६५३- ३५४२३

विज्ञान - २०२९० - १८८१९

एचएसव्हीसी - ६०३- ५९३

एकूण - ६८, १७८- ५९,३२२

.....

Web Title: Admission to 59 thousand 322 students in the special round of 11th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.