निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

By Admin | Updated: September 17, 2014 00:53 IST2014-09-17T00:53:05+5:302014-09-17T00:53:05+5:30

विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईच्या उपनगरांतील यंत्रणा सज्ज झाली आहे. उपनगर जिल्ह्यात 26 विधानसभा मतदारसंघ आहेत.

The administrative machinery ready for the elections | निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईच्या उपनगरांतील यंत्रणा सज्ज झाली आहे. उपनगर जिल्ह्यात 26 विधानसभा मतदारसंघ आहेत. जिल्ह्यात एकूण 76 लाख 56 हजार 975 मतदार असून, त्यामध्ये पुरुष मतदार 42 लाख 2क् हजार 614 आणि स्त्री मतदार 34 लाख 36 हजार 225 आहेत. शिवाय उपनगरांतील मतदान केंद्रांची संख्या 7 हजार 313 असून, निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सुमारे 48 हजार कर्मचारी तैनात असणार आहेत.
16 सप्टेंबर ते 27 ऑक्टोबर 2क्13 या कालावधीत विशेष मोहिमेअंतर्गत 3 लाख 16 हजार 9क्4 मतदारांची नोंदणी झाली आहे. एप्रिल 2क्14 दरम्यान घेतलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत 2 लाख 6 हजार 269 मतदारांची नोंदणी झाली आहे. लोकसभा 2क्14 च्या सार्वत्रिक निवडणुकांनतर 9 जून ते 3क् जूनदरम्यान मुंबईच्या उपनगरांत विशेष मोहिमेअंतर्गत 1 लाख 39 हजार 264 नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे. विशेष मोहिमेअंतर्गत आतार्पयत एकूण 6 लाख 62 हजार 4क्7 मतदारांची नोंदणी झाली आहे. निरंतर प्रक्रियेद्वारे 43 हजार 416 अर्ज प्राप्त झाले आहेत, तर 18 ते 19 या वयोगटातील 96 हजार 376 मतदारांचा उपनगरांत समावेश आहे. (प्रतिनिधी)
 
मतदान करण्यासाठी यादीत मतदाराचे नाव असणो अनिवार्य आहे. निवडणुकांपूर्वी नाव यादीत असल्याची सर्व मतदारांनी खात्री करणो गरजेचे आहे. ज्यांच्याकडे मतदार ओळखपत्र आहे, पण ज्यांची नावे यादीत नाहीत त्यांनी नाव मतदार यादीत असल्याची खात्री करावी, असे आवाहन जिल्हाधिका:यांनी केले आहे.
 
पथनाटय़ातून जागृती
पोस्टर आणि बॅनरव्यतिरिक्त जनजागृतीसाठी पथनाटय़ाचीही मदत घेतली जात आहे. शहरातील रेल्वे स्थानक, बस आगार, प्रसिद्ध मंदिरे, बाजारपेठा या ठिकाणी रोज 4 ते 5 पथनाटय़े सादर करण्यात येत आहेत.
 
सहकार खात्याचीही मदत : मतदार नोंदणीसाठी प्रत्येक सहकारी संस्थेच्या अध्यक्षांना सूचना देण्यात आल्या आहेत. सहकारी संस्थांत राहणा:या रहिवाशांसोबत काम करणा:या कर्मचा:यांची नोंदणी झाली की नाही, त्याची शहानिशा करून नोंद करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. मुंबईत सुमारे 6 हजार सहकारी संस्था असल्याची माहिती दळवी यांनी दिली. 
 
मतदार नोंदणीचा आज शेवटचा दिवस
मतदार नोंदणीसाठीचा आजचा शेवटचा दिवस असून, मतदार याद्यांमधील ज्यांची नावे वगळण्यात आली होती, अशा 6 लाख 13 हजार मतदारांना भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अर्ज क्रंमाक-6 स्पीड पोस्टाद्वारे पाठविण्यात आले होते. त्यापैकी 94 हजार 775 मतदारांकडून अर्ज मिळाल्याची पोचपावती मिळाली आहे. त्यापैकी 4 लाख 4 हजार 426 मतदारांची पत्रे परत आली आहेत. आणि उपनगरांत यादीत नाव नोंदविण्यासाठी 13 मोबाइल व्हॅन फिरविण्यात आल्या असून, त्याद्वारे 3 हजार 315 इतके अर्ज क्रमांक 6 जमा झाले आहेत.
 
मतदार नोंदणीसाठी पालिकेची झाड़ून जनजागृती
चेतन ननावरे ल्ल मुंबई 
मुंबई शहरातील मतदारांच्या संख्येत सुमारे 5क् हजारांनी वाढ झाल्याची माहिती नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्ध केली. ही वाढ होण्यात मुंबई महानगरपालिकेचाही सिंहाचा वाटा आहे. कारण मतदार नोंदणीत जिल्हाधिकारी कार्यालयाला मदत करण्यासाठी पालिकेने स्वत:च्या स्वच्छ मुंबई अभियानाची यंत्रणाच कामाला लावली आहे.
पालिकेच्या या अभियानाच्या माध्यमातून मतदार नोंदणीबाबत जनजागृती सुरू असल्याचे मुख्य समन्वयक सुभाष दळवी यांनी सांगितले. दळवी म्हणाले, ‘मुंबई शहर व उपनगरात स्वच्छता मुंबई प्रबोधन अभियानाअंतर्गत 74क् संस्था पालिकेसोबत काम करत आहेत. प्रत्येक संस्थेचे 5 ते 18 युनिट विविध विभागांत कार्यरत आहेत. अशाप्रकारे एकूण 9 हजार 6क्क् युनिट शहरातील कानाकोप:यात काम करत आहेत. एका युनिटकडे विभागातील 15क् कुटुंबांची जबाबदारी देण्यात आलेली आहे.’ त्यामुळे अभियानाचे जाळे शहरातील झोपडपट्टीपासून उच्चभ्रू वस्तीच्या घरा-घरांत पोहोचल्याचा दावा दळवी यांनी केला आहे.
दरम्यान, ियांसाठी काम करणा:या पालिकेच्या आरोग्य सेविकाही या कामात सहकार्य करत असल्याचे दळवी यांनी सांगितले. सुमारे 2क्क् ते 25क् कुटुंबांसोबत एका आरोग्य सेविकाचा रोजचा संपर्क असतो. याशिवाय घनकचरा व्यवस्थापनाच्या चौक्या आणि कचरा वाहून नेणा:या गाडय़ांवरही मतदानाबाबत जनजागृती करणारे पोस्टर लावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पालिकेच्या इतर आस्थापनांमधील सर्व नागरिक सुविधा केंद्र, जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालय, उपाहारगृहे या ठिकाणी मतदार नोंदणी करण्याचे आवाहन करणारे बॅनर आणि पोस्टर लावण्यात आले आहे.

 

Web Title: The administrative machinery ready for the elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.