रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाबाबत प्रशासन उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2015 01:46 IST2015-06-19T01:46:20+5:302015-06-19T01:46:20+5:30

एकीकडे मुंबई महापालिका रेनवॉटर हार्वेस्टिंगची सक्ती करण्याचा विचार करत असली तरी ही योजना आपल्याच उद्यान, शाळा व रुग्णालयांमध्ये राबविण्यात पालिकेला अपयश आले आहे़

Administration depressed about Rainwater Harvesting Project | रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाबाबत प्रशासन उदासीन

रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाबाबत प्रशासन उदासीन

मुंबई : एकीकडे मुंबई महापालिका रेनवॉटर हार्वेस्टिंगची सक्ती करण्याचा विचार करत असली तरी ही योजना आपल्याच उद्यान, शाळा व रुग्णालयांमध्ये राबविण्यात पालिकेला अपयश आले आहे़
भूजलाची पातळी दिवसेंदिवस खालावत असल्याने पालिकेने ३०० चौ़मी़ जागेतील इमारतींना रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प सक्तीचा केला़ मात्र या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत नसल्याने इमारतींना प्रोत्साहन देण्यासाठी मालमत्ता करात सूट देण्याची योजना १ एप्रिल २०१० पासून पालिकेने अमलात आणली़ मात्र राज्य सरकारने धोरण व नियमावली तयार न केल्यामुळे या योजनेचे निकष आणि इमारतींवर देखरेखीसाठी यंत्रणा उभी राहू शकली नाही़ तसेच खर्चीक असल्याने अनेक इमारती या प्रकल्पासाठी इच्छुक नाहीत़
नगरसेवकांच्या स्वेच्छा निधीतून या प्रकल्पासाठी इमारतींना आर्थिक मदत करण्याची सूट द्यावी, अशी मागणी सदस्यांनी स्थायी समितीच्या बैठकीत आज केली़ मंडई, शाळा, उद्यान व रुग्णालयांत हा प्रकल्प उभारण्यास पालिका उदासीन असल्याचा आरोप सदस्यांनी केला़ मात्र या प्रकल्पाबाबत कोणतीच माहिती प्रशासनाकडे उपलब्ध नव्हती़ त्यामुळे सर्व इमारतींना या प्रकल्पाची सक्ती करण्यात येईल, असे स्पष्ट करीत अतिरिक्त आयुक्त श्रीनिवास यांनी वेळ मारून नेली़

योजनेतील अडचणी : रेन वॉटर हार्वेस्टिंग् हा प्रकल्प असलेल्या इमारतींना मालमत्ता करामध्ये पाच टक्के सूट देण्याची तरतूद नियमात आहे़ परंतु याबाबत निश्चित धोरण नसल्यामुळे ही योजना रखडली आहे़ या योजनेसाठी पात्र इमारत व त्यावरील देखरेख करणारी यंत्रणा कशी असावी? याबाबत नियमामध्ये स्पष्टता नाही़ या योजनेचा लाभ घेण्यासाठी इमारती रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प उभारतील़ मात्र त्यानंतर हा प्रकल्प कार्यान्वित आहे का? याची नियमित खातरजमा कशी करावी? याबाबतही अद्याप काही ठरलेले नाही़

Web Title: Administration depressed about Rainwater Harvesting Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.