आदिवासी मुल होणार ज्येष्ठांचा आधार!

By Admin | Updated: July 19, 2015 21:24 IST2015-07-19T21:24:27+5:302015-07-19T21:24:27+5:30

पूजा दामले : मुंबई ज्येष्ठांना मदत हवी असते, पण अनेकदा जास्त पैसे देऊनही मदत मिळत नाही. तर, दुसरीकडे आदिवासी पाड्यातील मुलांना रोजगाराची गरज असते पण, त्यांना ती संधी मिळत नसते. या दोघांनाही मदत करण्यासाठी एक अनोखा उपक्रम मुंबईत सुरु करण्यात आला आहे. आदिवासी पाड्यातील मुलांना प्रशिक्षित करून ज्येष्ठांना मदतीचा हात देणारा हा उपक्रम.

Adivasi children will be the basis of the senior citizens! | आदिवासी मुल होणार ज्येष्ठांचा आधार!

आदिवासी मुल होणार ज्येष्ठांचा आधार!

जा दामले : मुंबई ज्येष्ठांना मदत हवी असते, पण अनेकदा जास्त पैसे देऊनही मदत मिळत नाही. तर, दुसरीकडे आदिवासी पाड्यातील मुलांना रोजगाराची गरज असते पण, त्यांना ती संधी मिळत नसते. या दोघांनाही मदत करण्यासाठी एक अनोखा उपक्रम मुंबईत सुरु करण्यात आला आहे. आदिवासी पाड्यातील मुलांना प्रशिक्षित करून ज्येष्ठांना मदतीचा हात देणारा हा उपक्रम.
हेल्पएज इंडिया, टाटा कम्युनिकेशन आणि भक्ती वेदांत रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी मुलांना प्रशिक्षित करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. पहिल्या टप्प्यात ठाण्यातील वाडा, पालघर येथील आदिवासी पाड्यातील २५ मुलांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. या मुलांनी काही कारणास्तव अर्धवट शिक्षण सोडलेले आहे, किंवा दहावीनंतर शिक्षण घेतलेले नाही. दोन महिने या मुलांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. शहरी भागातील अनेक ज्येष्ठ नागरिक एकटेच राहतात. त्यांना मदतीची गरज असते. ज्येष्ठ नागरिक आजारी असतील तर त्यांची काळजी घेण्यासाठी, एकट्या राहणार्‍यांना वस्तू, औषध आणण्यासाठी, रुग्णालयात असताना त्यांची सुश्रुषा करण्यासाठी अशा अनेक प्रकारे ज्येष्ठांना मदतीची गरज असते. त्यांना मदत मिळावी म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात आला असल्याचे हेल्पएज इंडियाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश बोरगावकर यांनी सांगितले.
आदिवासी पाड्यात राहणार्‍या अनेक हुशार मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण मिळत नसल्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाहीत. वाडा, पालघर येथील काही मुलांना आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागते. पण, ते हुशार असतात. त्यांच्याकडे शिकण्याची जिद्द असते. म्हणूनच २५ मुलांची निवड करण्याआधी त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्या मुलांच्या आवडीनिवडी, काम करण्याची इच्छा, ज्येष्ठांविषयीचे त्यांचे मत हे या मुलाखतीतून तपासण्यात आले. यानंतर २५ मुलांची निवड करण्यात आली. दोन महिने या मुलांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यानंतर या मुलांना नोकरी मिळवून देण्यास मदत करणार असल्याचे बोरगावकर यांनी सांगितले.
...........................
(चौकट)
कसे असणार प्रशिक्षण?
प्रशिक्षणाचा कालावधी - २ महिने
पहिल्या महिन्यांत त्यांना घरात ज्येष्ठांना कशी मदत करायची याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणात पहिल्यांदा ज्येष्ठांशी संवाद कसा साधायचा? हे या मुलांना शिकवले जाणार आहे. एकट्याच राहणार्‍या ज्येष्ठांच्या समस्या कोणत्या असतात, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काय करावे?, स्पंजिंग कसे करावे, औषध देताना काय काळजी घ्यावी, हे शिकवले जाणार आहे.
दुसर्‍या महिन्याच्या पहिल्या १५ दिवसांत मुलांना रुग्णालयात प्रशिक्षण दिले जाणार आहे. तिथे असणार्‍या वृद्धांची कशी काळजी घ्यावी, रुग्णालयातील इतर रुग्णांची काळजी कशी घ्यावी याविषयी प्रशिक्षण दिले जाणार आहे.
तर उर्वरित १५ दिवसांत इतर कौशल्य त्यांना शिकवली जाणार आहेत.

Web Title: Adivasi children will be the basis of the senior citizens!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.