आदित्य टॉवरच्या बिल्डरची हायकोर्टात धाव
By Admin | Updated: December 21, 2014 01:20 IST2014-12-21T01:20:51+5:302014-12-21T01:20:51+5:30
आदित्य टॉवरचे तब्बल चौदा मजले अवैध ठरवून ते पाडा, या दिवाणी न्यायालयाच्या निकालाविरोधात टॉवर बांधणारी मेसर्स के. पटेल अॅण्ड कंपनीने उच्च न्यायालयात अपिल केले आहे.

आदित्य टॉवरच्या बिल्डरची हायकोर्टात धाव
मुंबई : बोरीवली लोकमान्य टिळक रोडवरील आदित्य टॉवरचे तब्बल चौदा मजले अवैध ठरवून ते पाडा, या दिवाणी न्यायालयाच्या निकालाविरोधात टॉवर बांधणारी मेसर्स के. पटेल अॅण्ड कंपनीने उच्च न्यायालयात अपिल केले आहे. ७ जानेवारीला याची सुनावणी होईल. आदित्य टॉवर १८ मजली आहे. मात्र टॉवरचे १३ मजले अनधिकृत असल्याचा दावा नंदाधाम सोसायटीने केला व दिंडोशी नगर दिवाणी न्यायालयात धाव घेतली होती. नंदाधामने केलेल्या आरोपात तथ्य असल्याचे निरीक्षण नोंदवत आदित्य टॉवरचे १३ मजले पाडा, असे आदेश दिले होते. या निकालाविरोधात कंपनीने उच्च न्यायालयात अपील याचिका केली आहे. (प्रतिनिधी)
हा टॉवर बेकायदा असल्याचा आरोप करत येथील नंदाधाम इमारतीतील रहिवाशांनी न्यायालयात धाव घेतली. टॉवर बांधताना नंदाधाम इमारतीच्या परिसराचा दुरुपयोग बिल्डरने केला. एफएसआय कन्व्हेअन्स देण्यास बिल्डरने नकार दिला. नंदाधाम इमारतीच्या रहिवाशांच्या अर्जाची दखल घेत न्यायालयाने आदित्य टॉवर बांधताना एफएसआय व टीडीआरचा दुरुपयोग झाल्याचा निष्कर्ष नोंदवत अवैध मजले तोडण्याचे आदेश दिले.