Join us  

बाळासाहेब ठाकरे स्मारक न्यासाच्या अध्यक्षपदी आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 5:44 AM

याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या न्यासाचे अध्यक्ष होते. मात्र त्यांनी २५ नोव्हेंबर २०१९ रोजी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

सांगली : शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कजवळील महापौर बंगल्यात उभारण्यात येत असलेल्या स्मारकाच्या समितीचे अध्यक्ष म्हणून राज्य शासनाने सोमवारी पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची नियुक्ती केली. उद्योग मंत्री सुभाष देसाई हे या न्यासाचे सदस्य सचिव असतील. सदस्य म्हणून सुप्रसिद्ध वास्तुशास्त्रज्ञ शशी प्रभू यांची नियुक्ती करण्यात आली आहे.याशिवाय राज्याचे मुख्य सचिव, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त हे न्यासाचे पदसिद्ध सदस्य असतील. सदस्यांची चार पदे रिक्त ठेवण्यात आली आहेत. अध्यक्षांसह सर्व सदस्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल. याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या न्यासाचे अध्यक्ष होते. मात्र त्यांनी २५ नोव्हेंबर २०१९ रोजी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. 

 

टॅग्स :आदित्य ठाकरेशिवसेनाबाळासाहेब ठाकरे