Join us
Daily Top 2Weekly Top 5

आदित्य ठाकरेंनी धर्मवीर आनंद दिघेंना वाहिली आदरांजली, शेअर केला खास फोटो 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2022 16:25 IST

Aditya Thackeray: शिवसेना आमदार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनीही स्वर्गीय आनंद दिघे यांना आदरांजली वाहिली आहे. तसेच आदित्य ठाकरे यांनी आनंद दिघे यांना आदरांजली वाहताना एक खास फोटो शेअर केला आहे. 

ठाणे - शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा आज स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त त्यांना शिवसेनेचे नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून आदरांजली वाहण्यात येत आहे. शिवसेना आमदार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनीही स्वर्गीय आनंद दिघे यांना आदरांजली वाहिली आहे. तसेच आदित्य ठाकरे यांनी आनंद दिघे यांना आदरांजली वाहताना एक खास फोटो शेअर केला आहे. 

आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून आनंद दिघे यांना आदरांजली वाहिली. धर्मवीर स्व. आनंद दिघे साहेब यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन, असं ट्विट आदित्य ठाकरें यांनी केलं आहे. या ट्विटचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी या ट्विटमध्ये आनंद दिघे यांच्यासोबतचा जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आनंद दिघे, उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्यासोबत लहानपणीचे आदित्य ठाकरे दिसत आहेत. नवरात्रौत्सवात देवीचं दर्शन घेण्यासाठी गेले असताना हा फोटो काढण्यात आला होता.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या अनेक आमदार आणि खासदारांनी बंड केल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा आणि त्यांच्या विचारांचा वारसदार कोण यावरून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि शिंदे गट यांच्यामझ्ये रस्सीखेच सुरू आहे. 

टॅग्स :आदित्य ठाकरेशिवसेनाठाणे