Join us
Daily Top 2Weekly Top 5

आदित्य ठाकरे शिवसेनेच्या नेतेपदी, कार्यकारिणी बैठकीत अधिकृत घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2018 14:51 IST

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची शिवसेनेच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज पार पडली असून या बैठकीत आदित्य ठाकरेंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

मुंबई - युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची शिवसेनेच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज पार पडली असून या बैठकीत आदित्य ठाकरेंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज पार पडलेल्या या बैठकीत शिवसेनेच्या नेत्यांची नावे जाहीर करण्यात आली. यावेळी आदित्य ठाकरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. 

मनोहर जोशी आणि सुधीर जोशी यांचं नेतेपद कायम ठेवण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे, चंद्रकांत खैरे, आनंदराव अडसूळ, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंतजी गीते यांची शिवसेनेच्या नेतेपदी; तर मिलिंद नार्वेकर यांची शिवसेनेच्या सचिवपदी निवड करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे, चंद्रकांत खैरे, अनंत गिते, आनंदराव अडसूळ यांची शिवसेनेच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. निलम गोऱ्हे, मनिषा कायंदे, अमोल कोल्हे आणि अनिल परब यांची शिवसेनेच्या प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. 

टॅग्स :आदित्य ठाकरेशिवसेना