अभिनेत्री यामी गौतमला ईडीकडून पुन्हा समन्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:05 IST2021-07-03T04:05:37+5:302021-07-03T04:05:37+5:30
दीड कोटींचे आर्थिक गैरव्यवहार प्रकरण लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतमला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पुन्हा ...

अभिनेत्री यामी गौतमला ईडीकडून पुन्हा समन्स
दीड कोटींचे आर्थिक गैरव्यवहार प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतमला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पुन्हा समन्स बजावले आहे. परदेशी चलन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तिला दुसऱ्यांदा समन्स बजावण्यात आले आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊनचे कारण देत यामीने चौकशीला हजर राहणे टाळले होते.
यामीने विविध जाहिरातींसह ‘विकी डोनर’, ‘काबिल’, ‘बदलापूर’, ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. यामीने जून महिन्यात ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाचा दिग्दर्शक आदित्य धरशी लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय होता. तर दुसरीकडे यामीच्या खात्यात परदेशातून आलेल्या दीड कोटी रुपयांच्या आर्थिक व्यवहाराबाबत ईडीला संशय आहे. यात काहीतरी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा संशय ईडीला आहे. परकीय विनिमय व्यवस्थापन कायद्याच्या (फेमा) उल्लंघनप्रकरणी यामी सध्या ईडीच्या रडारवर आहे.