अभिनेत्री विद्या बालनला झाली डेंग्यूची लागण
By Admin | Updated: September 16, 2016 17:27 IST2016-09-16T17:27:15+5:302016-09-16T17:27:15+5:30
‘कहानी 2’ या आपल्या आगामी चित्रपटाचं शूटिंग करुन नुकतंच अमेरिकेहून परतलेली अभिनेत्री विद्या बालनला डेंग्यूची लागण

अभिनेत्री विद्या बालनला झाली डेंग्यूची लागण
>ऑनलाइन लोकमत
मुंबई,दि.16- ‘कहानी 2’ या आपल्या आगामी चित्रपटाचं शूटिंग करुन नुकतंच अमेरिकेहून परतलेली अभिनेत्री विद्या बालनला डेंग्यूची लागण झाली आहे. 10 दिवस पूर्ण आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी विद्याला दिला आहे.
मुंबई महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी विद्या बालनच्या जुहू येथील घराची तपासणी केल्याचं समजत आहे. तीच्या घराच्या गच्चीवर डेंग्यूच्या अळ्या सापडल्या होत्या , मात्र पालिकेने त्या नष्ट केल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली . प्रसिद्ध दिग्दर्शक यश चोप्रा यांचा 2012 मध्ये डेंग्यूमुळेच मृत्यू झाला होता.
सध्या विद्या बालनचे ''कहानी 2' आणि 'बेगम जान' हे दोन चित्रपट येऊ घातले आहेत.