Actress Shilpa Shetty has filed a complaint against her husband | अभिनेत्री शिल्पा शेट्टीसह तिच्या पतीवर गुन्हा दाखल
अभिनेत्री शिल्पा शेट्टीसह तिच्या पतीवर गुन्हा दाखल
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. चित्रपट अभिनेत्री शिल्पा शेट्टी, तिचे पती राज कुंद्रा, दर्शित इंद्रवन शहा, उदय कोठारी, वेदांत विकास बाल्टी यांच्या बेस्ट डिल टीव्ही प्रा. लि. कंपनीवर कोनगाव पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
गोरेगावमधील रवी मोहनलाल भालोटिया यांची भालोटिया एक्स्पोर्ट कंपनी आॅनलाईन शॉपिंग कंपन्यांना बेडशीट पुरवते. त्यापैकी बेस्ट डील टीव्ही प्रा. लि. या कंपनीने वेगवेगळ्या कॉलसेंटरच्या माध्यमातून व ई मेलवरून बेडशीटच्या मालाच्या मागणीनुसार माल पुरविला. त्या विक्रीतून आलेले पैसे बेस्ट डील कंपनीच्या बँक अकाऊन्टवर जमा केले. पण ते पैसे व्हेंडर अ‍ॅग्रिमेंट व बिल नोटप्रमाणे भालोटिया एक्स्पोर्ट कंपनीला दिले नाहीत. या २४ लाख १२ हजार ८७७ रूपयांच्या रकमेचा परस्पर अपहार केल्याप्रकरणी रवी भालोटिया यांनी बेस्ट डील कंपनी आणि तिच्या सर्व संचालकांवर कोनगाव पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 
 

Web Title: Actress Shilpa Shetty has filed a complaint against her husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.