बलात्कार केल्याप्रकरणी अभिनेता विशाल ठक्करला अटक
By Admin | Updated: October 19, 2015 22:05 IST2015-10-19T21:01:31+5:302015-10-19T22:05:46+5:30
टी.व्ही. अभिनेत्रीवर बलात्कार केल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेता विशाल ठक्करला पोलिसांनी त्याच्या घरुन अटक केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

बलात्कार केल्याप्रकरणी अभिनेता विशाल ठक्करला अटक
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - टी.व्ही. अभिनेत्रीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरुन बॉलिवूड अभिनेता विशाल ठक्कर याला पोलिसांनी अटक केली आहे. अभिनेता विशाल ठक्कर याच्याविरोधात येथील चारकोप पोलीस स्टेशनमध्ये टी.व्ही. अभिनेत्रीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता, त्यानुसार आज पोलिसांनी अटकेची कारवाई केली.
विशाल आणि 'त्या' अभिनेत्रीची ओळख एका मालिकेदरम्यान २०१३ मध्ये झाली. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्यावर एक वर्षापासून सदर अभिनेत्री आणि विशाल ठक्कर मुंबईत लिव इन रिलेशनशीपमध्ये राहू लागले. यादरम्यान विशालने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला आणि नंतर लग्न करण्यास नकार दिला, असे या अभिनेत्रीचे म्हणणे आहे. दरम्यान, या अभिनेत्रीने सावधान इंडिया, हाय पडोसन, जय बजरंगबली यांसारख्या मालिकामध्ये काम केले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र गायकवाड यांनी दिली.
विशाल याच्यावर आयपीसी सेक्शन ३७६(बलात्कार), ४२०(फसवणूक),३२३, ५०९, ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.
विशालने मुन्नाभाई एमबीबीएस, चांदनी बार, तारक मेहता का उल्टा चश्मा यांसारखे चित्रपट आणि मालिकांमध्ये भूमिका केल्या आहेत.