अभिनेता शाहिद कपूरने वरळीत समुद्र किनारी खरेदी केला ६० कोटींचा आलिशान फ्लॅट

By मनोज गडनीस | Updated: May 30, 2024 16:21 IST2024-05-30T16:19:39+5:302024-05-30T16:21:38+5:30

अभिनेता शाहिद कपूर व त्याची पत्नी मीरा कपूर यांनी वरळीतील एका आलिशान इमारतीमध्ये ६० कोटी रुपयांना एका फ्लॅटची खरेदी केली आहे.

Actor Shahid Kapoor bought a luxury flat in Worli for Rs 60 crore | अभिनेता शाहिद कपूरने वरळीत समुद्र किनारी खरेदी केला ६० कोटींचा आलिशान फ्लॅट

अभिनेता शाहिद कपूरने वरळीत समुद्र किनारी खरेदी केला ६० कोटींचा आलिशान फ्लॅट

मुंबई - अभिनेता शाहिद कपूर व त्याची पत्नी मीरा कपूर यांनी वरळीतील एका आलिशान इमारतीमध्ये ६० कोटी रुपयांना एका फ्लॅटची खरेदी केली आहे. विशेष म्हणजे, याच इमारतीमध्ये शाहिद कपूर याचे आणखी दोन आलिशान फ्लॅट असून त्याची खरेदी त्याने २०१८ या वर्षी ५८ कोटी रुपयांना केली होती.

प्राप्त माहितीनुसार, २४ मे रोजी या फ्लॅट खरेदीचा व्यवहार पूर्ण झाला असून शाहिद कपूरने या फ्लॅटच्या खरेदीसाठी १ कोटी ७५ लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क भरले आहे. या फ्लॅटचे आकारमान ५ हजार ३९५ चौरस फूट असे प्रशस्त आहे. यासोबत त्याला तीन पार्किंग देखील मिळाले आहेत. एका कंपनीने २०२३ मध्ये या इमारतीमध्ये एकूण २८ फ्लॅटची एकत्रित खरेदी केली होती.

फेब्रुवारी २०२३ मध्ये तो व्यवहार १२३८ कोटी रुपयांना झाला होता. प्रति चौरस फूट ६५ हजार रुपयाने त्यावेळी या फ्लॅटची विक्री झाली आहे. गेल्या सव्वा वर्षात येथील प्रति चौरस फूट दरात ३५ हजार रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे शाहिद कपूर याला या फ्लॅटच्या खरेदीसाठी प्रति चौरस फूट सुमारे १ लाख रुपये दराने ही खरेदी करावी लागली आहे.

Web Title: Actor Shahid Kapoor bought a luxury flat in Worli for Rs 60 crore