अभिनेता साई बल्लाळ गजाआड

By Admin | Updated: July 16, 2015 22:31 IST2015-07-16T22:31:35+5:302015-07-16T22:31:35+5:30

एका ५८ वर्षीय महिलेला मोबाईलवर अश्लील व्हीडिओ आणि मेसेज पाठविल्याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी साई बल्लाळ (५२) या टीव्ही अभिनेत्याला मालाड येथील निवासस्थानाहून अटक केली.

Actor Sai Ballal Gajaad | अभिनेता साई बल्लाळ गजाआड

अभिनेता साई बल्लाळ गजाआड

मुंबई : एका ५८ वर्षीय महिलेला मोबाईलवर अश्लील व्हीडिओ आणि मेसेज पाठविल्याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी साई बल्लाळ (५२) या टीव्ही अभिनेत्याला मालाड येथील निवासस्थानाहून अटक केली.
बल्लाळ ‘उडान’ या हिंदी मालिकेत प्रमुख भूमिकेत आहे. बोरीवली पोलिसांनुसार तक्रारदार महिला देखील अभिनेत्री असून तिने बल्लाळविरोधात १४ जुलैला तक्रार दिली होती. बल्लाळविरोधात विनयभंग, माहिती तंत्रज्ञान कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला. गुन्हयातील आरोपीला काल रात्री त्याच्या मालाड येथील निवासस्थानाहून अटक केल्याची माहिती बोरिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गुणाजी सावंत यांनी ‘लोकमत’ला दिली. तक्रारदार महिलेल्या व्हॉट्सअ‍ॅपवर बल्लाळने अश्लील व्हीडिओ आणि मेसेज टाकले होते. त्यामुळे पडताळणीसाठी त्याचा मोबाईल हस्तगत केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Actor Sai Ballal Gajaad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.