अभिनेता राहुल रॉय नानावटी रुग्णालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:05 IST2020-12-02T04:05:44+5:302020-12-02T04:05:44+5:30
ब्रेन स्ट्रोकचा झटका लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : आशिकी या सुपरहिट चित्रपटातून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या राहुल रॉयला ब्रेन स्ट्रोकचा ...

अभिनेता राहुल रॉय नानावटी रुग्णालयात
ब्रेन स्ट्रोकचा झटका
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आशिकी या सुपरहिट चित्रपटातून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या राहुल रॉयला ब्रेन स्ट्रोकचा झटका आला आहे. त्याला मुंबईतील विलेपार्ले येथील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राहुल राॅय सध्या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होता. परंतु चित्रीकरणादरम्यानच त्याची तब्येत अचानक बिघडली. त्याला नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राहुलला (५२) सध्या अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याला प्रोग्रेसिव्ह ब्रेन स्ट्रोक आल्याची माहिती समोर आली आहे.
त्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याचे समजते. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून उपचारांनाही तो योग्य प्रतिसाद देत असल्याची माहिती आहे. त्याच्या प्रकृतीसाठी त्याच्या चाहत्यांकडूनही प्रार्थना केली जात आहे.