अभिनेत्री जयासुधा यांचे पती नितीन कपूर यांची आत्महत्या

By Admin | Updated: March 14, 2017 22:28 IST2017-03-14T22:22:52+5:302017-03-14T22:28:46+5:30

तेलगू अभिनेत्री आणि माजी आमदार जयासुधा यांचे पती नितीन कपूर यांनी इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचे वृत्त आहे.

Actor Jayshudha's husband Nitin Kapoor commits suicide | अभिनेत्री जयासुधा यांचे पती नितीन कपूर यांची आत्महत्या

अभिनेत्री जयासुधा यांचे पती नितीन कपूर यांची आत्महत्या

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - तेलगू अभिनेत्री आणि माजी आमदार जयासुधा यांचे पती नितीन कपूर यांनी इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार,  नितीन कपूर यांनी अंधेरी येथील इमारतीवरुन उडी मारुन मंगळवारी आत्महत्या केली. मात्र, या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. नितीन कपूर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांचे चुलत भाऊ व तेलगू अभिनेत्री जयसुधा यांचे पती होते. जयासुधा आणि नितीन कपूर यांच्या विवाह 1985 मध्ये झाला होता. त्यांना दोन मुले असून त्यांची नावे निहार आणि श्रेयन अशी आहेत. जयसुधा या आंध्र प्रदेशातील सिकंदराबादच्या आमदार होत्या. तसेच, त्यांनी 70-80च्या दशकात तेलगू चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. 
दरम्यान, पोलिसांनी नितीन कपूर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला आहे. 

Web Title: Actor Jayshudha's husband Nitin Kapoor commits suicide