अभिनेता अर्जुन रामपालच्या पार्टनरच्या भावाची जामिनावर सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:25 IST2020-12-16T04:25:09+5:302020-12-16T04:25:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालचा पार्टनर गॅब्रिएल याचा ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेला भाऊ ...

Actor Arjun Rampal's partner's brother released on bail | अभिनेता अर्जुन रामपालच्या पार्टनरच्या भावाची जामिनावर सुटका

अभिनेता अर्जुन रामपालच्या पार्टनरच्या भावाची जामिनावर सुटका

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालचा पार्टनर गॅब्रिएल याचा ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेला भाऊ ऍगिसिलाओस डिमेट्रीएड्स आणि अन्य दोघांची मंगळवारी विशेष एनडीपीएस न्यायालयाने जामिनावर सुटका केली.

डिमेट्रीएड्स याला अन्य एका केसमध्ये ऑक्टोबरमध्ये जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र, तो कारागृहातच राहिला. कारण पोलिसांनी त्याच्यावर ड्रग्ज प्रकरणी आणखी एक केस नोंदवली.

एकाच कारणासाठी एखाद्या व्यक्तीवर दोनदा गुन्हा नोंदविला जाऊ शकत नाही. त्याच्याविरुद्ध नवीन पुरावे सादर करण्यात आले नाहीत. तसेच अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार, एनसीबी अधिकाऱ्यासमोर दिलेला जबाब पुरावा म्हणून ग्राह्य धरू शकत नाही, असा युक्तिवाद डिमेट्रीएड्सच्या वकिलांनी न्यायालयात केला. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत विशेष न्यायालयाने डिमेट्रीएड्स व अन्य दोघांचा जामीन अर्ज मंजूर केला.

दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर एनसीबीने बॉलिवूड व ड्रग्सचे कनेक्शन शोधण्यास सुरुवात केली. त्यात अनेक बड्या लोकांना अटक करण्यात आली.

Web Title: Actor Arjun Rampal's partner's brother released on bail