Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेते अभिषेक सिंह यांचा ‘वर्ल्ड ऑफ वर्दी’साठी पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 03:33 IST

सुजैन खान यांच्या सहकार्याने वांद्रे ठाण्याचा कायाकल्प करणार

मुंबई : भारतीय प्रशासन सेवेतील (आयएएस) देशातील चर्चेतील अधिकारी आणि अभिनेते अभिषेक सिंह हे त्यांनीच हाती घेतलेल्या ‘वर्ल्ड ऑफ वर्दी’ या नव्या मोहिमेत येथील वांद्रे पोलीस ठाण्याचा कायाकल्प करणार आहेत. या कामात त्यांना साथ असेल ती अभिनेता हृतिक रोशनची माजी पत्नी आणि इंटेरियर डिझायनर सुजैन खान यांची.पोलीस ठाण्याची रचना नव्या पद्धतीने करण्याचे काम नि:शुल्क करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. प्रत्यक्षात काम सुरू करायच्या आधी १२ डिसेंबर रोजी अभिषेक सिंह आणि सुजैन खान यांनी वांद्रे पोलीस ठाण्याला भेटही दिली.अभिषेक सिंह यांनी सांगितले की, ‘वर्ल्ड ऑफ वर्दी’ चा पुढाकार हा नागरिकांना देशाच्या सशस्र सेनांच्या जवळ आणण्याचा आहे. पोलीस ठाण्यांना पुन्हा बनवणे हे त्याचे पहिले पाऊल आहे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी सुजैन खान पुढे आल्या याचे मला मोठे समाधान आहे. आम्ही वांद्रे पोलीस ठाण्यापासून सुरवात करू आणि पुढे चालून आम्ही आणखी जास्त ठाण्यांना समाविष्ट करण्याचा प्रयत्न करू’, असेही सिंह म्हणाले.  अभिषेक सिंह दिल्लीत कार्यरत असून व्हिडीओ अल्बम ‘दिल तोड के’ पासून अभिनेता म्हणून ते काम करत आहेत.