पंजा 7 घडय़ाळ लढतीने कार्यकर्ते खूष
By Admin | Updated: September 27, 2014 22:58 IST2014-09-27T22:58:39+5:302014-09-27T22:58:39+5:30
प्रत्येकाने स्वबळावर लढवून दाखवावे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अलीकडेच केले होते.
पंजा 7 घडय़ाळ लढतीने कार्यकर्ते खूष
>ठाणो: प्रत्येकाने स्वबळावर लढवून दाखवावे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अलीकडेच केले होते. त्यानंतर, जागावाटपाचे निमित्त झाले आणि आधीच उभयतांमध्ये सुरू असलेला बेबनाव चव्हाटय़ावर आला. हीच परिस्थिती गेल्या अडीच ते तीन वर्षापासून ठाणो शहर काँग्रेस- राष्ट्रवादीमध्ये सुरू होती. त्यामुळे प्रत्येकाने शेवटर्पयत ताणता येईल तेवढे ताणले आणि आता आघाडी फुटल्याचे जाहीर होताच जागा लढविण्यासाठी ‘पंजा’ आणि ‘घडय़ाळ’ एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
आधी आघाडीने भाजपाच्या सुहासिनी लोखंडे यांना फोडण्याचा प्रय} केला. नंतर, एकाच वेळी मनसे आणि आघाडीमधील काँग्रेसच्या अनिता किणो आणि शकिला कुरेशी यांना आपल्या तंबूत खेचण्यासाठी युतीने जोर लावला. त्यात ते यशस्वीही झाले. लोणावळ्यात असताना कुरेशी यांच्या पोटात दुखू लागल्यामुळे त्या अनिता यांच्यासमवेत गेल्या, तेव्हा दोघीही गायब झाल्या. त्यांना शोधण्यासाठी राजन किणोही गेले. त्यामुळे ऐन महापौर निवडणुकीच्या वेळी किणो दाम्पत्यासह कुरेशीही गैरहजर राहिल्या. तोर्पयत इकडे मनसेच्या पाठिंब्यावर ठाण्याचा गड राखण्यात युतीला यश मिळाले. पण, हातातोंडाशी आलेला घास किणोंमुळे गेल्यामुळे काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यात बरीच शाब्दिक चकमक उडाली होती. त्यामुळे काँग्रेसला किणोंवर कारवाई करणो भाग पडले होते. पुन्हा पोटनिवडणुकीला राष्ट्रवादीशी समझोता करून किणो बिनविरोध निवडून आले, तर अनिता किणोंना मात्र काँग्रेसने पोटनिवडणुकीलाही तिकीट नाकारले होते.
महापालिकेतही हवे होते वेगळे अस्तित्व
ठाणो महापालिकेतही काँग्रेसच्या गटाला वेगळे अस्तित्व हवे होते. त्यामुळे काँग्रेसच्या मनोज शिंदे यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याबाबतचा निर्णय प्रलंबित राहिल्याने शिक्षण मंडळ तसेच परिवहनचे सभापतीपद बरेच दिवस रिक्त होते. दरम्यान, याच काळात स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीतही 65-65 चे संख्याबळ असल्यामुळे युतीच्या बाजूने झुकलेल्या मनोज शिंदेंच्या गटाला राष्ट्रवादीने समजूत काढून पुन्हा आपल्याकडे आणले होते. त्याबदल्यात स्थायीच्या सभापदाची उमेदवारी काँग्रेसला अर्थात रवींद्र फाटकांना मिळाली. तिथे चिठ्ठय़ा टाकण्यात आल्या, तेव्हा फाटक यांनाच सभापतीपद मिळाले. काँग्रेसचे बंड थोपविण्यात त्या वेळी राष्ट्रवादीला यश मिळाले. मात्र, राष्ट्रवादीच्या हणमंत जगदाळेंकडे असलेले विरोधी पक्षनेतेपद मिळविण्यासाठी मनोज शिंदेंचा कसोशीने प्रय} सुरू होता. त्यातही जगदाळे सरस ठरले. त्यामुळे ही कुरबूर सुरूच होती.
अगदी अलीकडे 2क्14 च्या महापौर निवडणुकीपूर्वी पुन्हा काँग्रेसच्या रवींद्र फाटक यांच्यासह सात नगरसेवकांनी काँग्रेसला ‘हात’ दाखवित पक्षांतर केले. काँग्रेसच्या बंडखोर मीनल संख्ये यांनीही शिवसेनेच्या पाठिंब्यावर वागळे प्रभाग समितीचे सभापतीपद पदरात पाडून घेतले. महापौर निवडणुकीत मनोज शिंदेंसह तिघे जण उशिरा आल्याने त्यांचीही गैरहजेरी लागली. महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीला कांचन चिंदरकर यांनी आधी बंडखोरी करून शिवसेनेला मतदान केले आणि नंतर नगरसेवकपदाचाच राजीनामा दिला. ठाणो महापालिकेच्या बीएसयूपी योजनेंतर्गत लाभाथ्र्याना घरेवाटपाचा कार्यक्रमही राष्ट्रवादीचे कोपरीचे स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण यांनी उरकून घेतला. त्या वेळी काँग्रेसच्या नगरसेवकांना विश्वासात न घेतल्यामुळे मालती पाटील, विक्रांत चव्हाण, मनोज शिंदे आदींनी थेट पालिका आयुक्तांनाच याचा जाब विचारला होता. तेव्हाही उभयतांमधील वाद चव्हाटय़ावर आला होता. आता विधानसभेच्या निवडणुकीला काँग्रेसचे नगरसेवक राजन किणो यांनी थेट ‘मातोo्री’वर जाऊन उमेदवारीसाठी दरवाजा ठोठावला होता. त्यामुळे त्यांनीही आघाडी असतानाच राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांबरोबर निवडणूक लढवून दोन ‘हात’ करण्याची तयारी केली होती. एकूणच आघाडीमध्ये कुरबुरी सुरूच होती. परंतु, जागावाटपाचे निमित्त मिळाले आणि त्यांच्यात बिघाडी झाली. (प्रतिनिधी)
4ठाणो महापालिकेची 2क्12 ची निवडणूक होताच आघाडी आणि युतीला 65-65 चे संख्याबळ मिळाले. सारखेच संख्याबळ असल्यामुळे दोघांना सत्तासोपानाजवळ जाण्यासाठी अवघ्या काही जागांचीच गरज होती. त्यामुळे दोन्हीकडून फोडाफोडीच्या राजकारणाला अक्षरश: ऊत आला होता.
4ठाणो महापालिकेतही काँग्रेसच्या गटाला वेगळे अस्तित्व हवे होते. त्यामुळे काँग्रेसच्या मनोज शिंदे यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याबाबतचा निर्णय प्रलंबित राहिल्याने शिक्षण मंडळ तसेच परिवहनचे सभापतीपद बरेच दिवस रिक्त होते. स्थायी सभापतीपदाच्या निवडणुकीतही 65-65 चे संख्याबळ असल्यामुळे युतीकडे झुकलेल्या शिंदेंच्या गटाला राष्ट्रवादीने समजूत काढून पुन्हा आपल्याकडे आणले होते.