Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांचे केले जोरदार स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 18:53 IST

Bjp Nirmala sitaraman: भाजयुमोचे मुंबई अध्यक्ष तेजिंदर तिवाना यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी बाईक रॅलीवर स्वार होऊन उत्साहाने आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर केंद्रीय अर्थमंत्र्याचे जोरदार स्वागत केले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज मुंबई दोऱ्यावर आल्या होत्या.यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाच्या हजारो कार्यकर्त्यांनी त्यांचे आज सकाळी आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर जोरदार स्वागत केले.

भाजयुमोचे मुंबई अध्यक्ष तेजिंदर तिवाना यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी बाईक रॅलीवर स्वार होऊन उत्साहाने आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर केंद्रीय अर्थमंत्र्याचे जोरदार स्वागत केले.

 तेजिंदर सिंग तिवाना म्हणाले की, केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांचे  भव्य स्वागत करण्यासाठी युवा कार्यकर्ते विशेष उत्साहित होते. आज कोरोना साथीच्या आणि अर्थसंकल्पानंतर देश स्वस्थ व स्वावलंबी होण्याची गरज ओळखून केंद्रीय अर्थसंकल्पात देशातील स्वावलंबी आणि निरोगी तरतुदींना त्यांनी विशेष  प्राधान्य दिल्याबद्धल अर्थमंत्र्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मुंबईतील भाजयुमोचे तरूण कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

टॅग्स :निर्मला सीतारामनभाजपा