Join us

प्लॅस्टिक पिशव्या वापरणाऱ्या फेरीवाल्यांवर आजपासून कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 05:29 IST

महापालिकेच्या प्लॅस्टिकविरोधी मोहिमेला फेरीवाल्यांनी हरताळ फासला

मुंबई : महापालिकेच्या प्लॅस्टिकविरोधी मोहिमेला फेरीवाल्यांनी हरताळ फासला आहे. मात्र आता ग्राहकांना प्लॅस्टिक पिशव्या देणाºया अशा फेरीवाल्यांची १ फेब्रुवारीपासून महापालिकेचे पथक झाडाझडती घेणार आहे. अशावेळी प्लॅस्टिक पिशवी आढळल्यास त्या फेरीवाल्याचा परवानाच रद्द करण्यात येणार आहे.राज्य सरकारने २३ जून २०१८ पासून प्लॅस्टिकबंदी लागू केली आहे. त्यामुळे पालिकेच्या प्लॅस्टिकविरोधी मोहिमेला वेग मिळाला. सुरुवातीच्या सहा महिन्यांत सर्वत्र जोरदार कारवाई करण्यात आली. मात्र कारवाई शिथिल होताच फेरीवाल्यांनी पुन्हा प्लॅस्टिक पिशव्या देण्यास सुरुवात केलीे. त्यामुळे थेट कारवाई करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला.गेल्या सात महिन्यांमध्ये पालिकेने केलेल्या कारवाईत ३५ हजार किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले आहे. त्यानंतर आता आजपासून महापालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये ही कारवाई करण्यात येईल. यासाठी १०७ निरीक्षक, ४०० वरिष्ठ निरीक्षक आणि २६० कामगारांचे पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाच्या माध्यमातून फेरीवाल्यांची झडती घेतली जाईल.६० हजार फेरीवाल्यांचे परवाने अडचणीतअधिकृत फेरीवाल्यांना परवाना देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. पुढच्या महिन्यापासून मुंबईत केवळ अधिकृत फेरीवाल्यांना स्थान मिळणार आहे. परंतु, महापालिकेकडे अर्ज केलेल्या एकूण ९९ हजार ४३५ पैकी एकतृतीयांश म्हणजेच सुमारे ६० हजार फेरीवाल्यांचे परवाने अनिवार्य करण्यात आलेली कागदपत्रे आणि वास्तव्याचे पुरावे सादर न केल्यामुळे अडचणीत आले आहेत.

टॅग्स :प्लॅस्टिक बंदीमुंबई