दहा दिवसांत साडेतीन हजार जणांवर कारवाई
By Admin | Updated: September 7, 2014 23:43 IST2014-09-07T22:28:20+5:302014-09-07T23:43:42+5:30
मुंबई पोलिसांची दहा दिवसांत साडेतीन हजार जणांवर कारवाई

दहा दिवसांत साडेतीन हजार जणांवर कारवाई
मुंबई पोलिसांची दहा दिवसांत साडेतीन हजार जणांवर कारवाई
मुंबई: गणेश उत्सवादरम्यान शहरात काही अनुचित प्रकार घडून नये, यासाठी मुंबई पोलिसांनी गेल्या १० दिवसांपासून कडक पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. यामध्ये पोलिसांनी ३ हजार ४६३ जणांवर कारवाई केली आहे.
गणेश उत्सवदरम्यान शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी वाढते. याच गर्दीचा फायदा घेत अनेक पाकीटमार तसेच लुटारु मोठ्या प्रमाणात गुन्हे करतात. या गुन्हेगारांना रोखण्यासाठी पोलिसांनी शहरात तब्बल ४५ हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवला होता. याच दरम्यान पोलिसांनी १५१(१) कलमान्वये १७३१ जणांवर, १५१(३) कलमान्वये ४४८ जणांवर, सार्वजनिक ठिकाणी नशा करणार्या ६९० जणांवर, अंमली पदार्थांची तस्करी करणार्या ५ जणांवर, अन्य प्रतिबंधक कारवाईखाली १६ जणांवर आणि स्थानिक गुन्ाखाली ५७३ अशा एकूण ३ हजार ४६३ जणांवर कारवाई केली आहे. ही कारवाई २९ ऑगस्टपासून ९ सप्टेंबरपर्यंत करण्यात आली. (प्रतिनिधी)