बनावट जात प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांवर कारवाई
By Admin | Updated: September 2, 2015 02:51 IST2015-09-02T02:51:04+5:302015-09-02T02:51:04+5:30
म्हाडामार्फत २0१0 आणि ११मध्ये काढण्यात आलेल्या लॉटरीमध्ये बनावट जात प्रमाणपत्र सादर करून घर लाटणाऱ्या ५ जणांवर कारवाई करण्यात येणार आहे

बनावट जात प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांवर कारवाई
मुंबई : म्हाडामार्फत २0१0 आणि ११मध्ये काढण्यात आलेल्या लॉटरीमध्ये बनावट जात प्रमाणपत्र सादर करून घर लाटणाऱ्या ५ जणांवर कारवाई करण्यात येणार आहे. बनावट जात प्रमाणपत्र सादर केलेल्या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी म्हाडाने खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
म्हाडामार्फत २0१0 आणि २०११ या वर्षांमध्ये काढण्यात आलेल्या लॉटरीमध्येही एससी आणि एसटी प्रवर्गातून विजेते ठरलेल्या पाच जणांनी पात्रतेसाठी जात प्रमाणपत्र सादर केले होते. त्यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी केल्यानंतर त्यांनी सादर केलेले कागदपत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले होते.
म्हाडामार्फत २0१३ ते २०१५पर्यंत काढण्यात आलेल्या लॉटरीमध्ये आरक्षित प्रवर्गातून विजेते ठरलेल्या विजेत्यांचे जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीकडे पाठविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)