विनामास्क रेल्वे प्रवास करणाऱ्या १९३ प्रवाशांवर कारवाईचा बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:06 IST2021-06-21T04:06:23+5:302021-06-21T04:06:23+5:30
चौदा दिवसांत ३८ हजारांची दंडवसुली लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक ...

विनामास्क रेल्वे प्रवास करणाऱ्या १९३ प्रवाशांवर कारवाईचा बडगा
चौदा दिवसांत ३८ हजारांची दंडवसुली
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे. परंतु अनेक प्रवासी विनामास्क लोकल प्रवास करतात. त्यामुळे, अशा प्रवाशांवर पालिका आणि रेल्वेकडून कारवाई करण्यात येत आहे. १ ते १४ जूनदरम्यान १९३ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ३८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विनामास्क लोकल प्रवासासाठी मुभा नाही. लोकल प्रवाशांना नियम पाळण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले होते. मात्र, काही प्रवासी विनामास्क प्रवास करत आहेत, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका वाढत आहे. विनामास्क प्रवास करणाऱ्यांवर रेल्वे आणि महापालिका प्रशासनाकडून कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार मध्य रेल्वे मार्गावर १४ दिवसांत १९३ प्रवाशांकडून ३८ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना रेल्वे प्रवासाची मुभा नाही. मात्र तरीही अनेक जण अवैध रीतीने प्रवास करत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. १ ते १४ जून दरम्यान ६४८ जणांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून ३.२४ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.
..........................................